शेतकऱ्यांना साखरेचा गोडवा लागणार का ?
दरातील चढ उतार , कमी जास्त प्रमाणात होणारे उत्पादन यामुळे जवळजवळ सर्वच पिकांची चर्चा भारतभर सुरु आहे. आता या चर्चेमध्ये साखरेने देखील सहभाग घेतला आहे. साखरेचा गाळप हंगाम सध्या सुरळीतपणे चालला आहे. राज्यातील १८६ साखर कारखान्यांनी आता पर्यंत ३८० लाख टन व त्याहूनही जास्त गाळप केलेले आहे. यंदा आता पर्यंत ३६१ लाख क्विंटल साखर तयार झालेली आहे. तर उतारा हा साडेनऊ टक्के पर्यंत मिळत आहे.
आमचा साखर उत्पादनाचा अंदाज हा १०५ लेख टन असा होता. परंतु शेतकऱ्यांनी ऊस पिकाची उत्तम देखभाल केली आहे. त्यामुळेच उत्पादनात चांगली वाढ होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर साखर उतारा देखील अर्धा ते पाऊण टक्क्यांनी वाढला आहे. साखर उत्पादन यावेळेस इथेनॉल उत्पादनाशिवाय ११० लाख टन च्या आसपास होईल असे, ठोंबरे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात दर स्थिर ?
यावेळेस महाराष्ट्रामध्ये साखरेच्या दरात स्थिरता दिसून आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोलाचा वाट आहे असे म्हणता येईल. कारण शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतांना देखील त्यांनी साखर निर्यातीच्या कराराचा वेग हा कायम ठेवला आहे. आतापर्यंत अंदाजे ३७ लाख टन निर्यात करार करण्यात आले आहे असे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिअन च्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
साखर निर्यातीच्या अफवा…
साखर कोटा कमी केला जाईल, साखर निर्यातीत घट होईल, साखर निर्यातीस बंधने घेण्यात येणार आहे. अश्या अनेक अफवा काही मंडळींकडून पसरवण्यात येत आहे. साखर उद्योगाची तसेच साखर निर्यातीची हानी होईल अशी कोणतीही अफवा कानावर पडल्यास त्यावर विश्वास ठेऊ नये असे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिअनचे अध्यक्ष ठोंबरे यांनी स्पष्ट केले आहे.