सोयाबीन, कांद्याबरोबर कापसाच्या वाढीव दराने बाजारसमितीमध्ये हलचल
कापसाला ( Cotton) सुरुवातीला चांगला दर मिळाला होता मात्र मध्ये दरात चढ उतार होत असून नंतर पुन्हा दरात तेजी दिसून आली आहे. मागील ५० वर्षांमधील सर्वात उच्चांक दर यंदा कापसाला मिळाला आहे. शेत मालास योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मागील काही महिन्यापासून महत्वाची भूमिका घेतली असून ४ महिन्यांपासून शेतकऱ्यांनी कापसाची सोयाबीन प्रमाणे साठवणूक केली होती.
कापूस उत्पादनात झालेली घट आणि त्याची वाढती मागणी यामुळे कापसाच्या दराने १० हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.कापसाचे दर वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे उत्पादनात झालेली घट. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगला दर होता. तर सरकीच्या दरात वाढ झाली की कापसाच्या मागणीत देखील वाढ होत आहे. कापसाच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा आहे.
कापसाचे सध्याचे दर काय आहे ?