ब्लॉग

जैविक पद्धतीचा अवलंब केला तर पिकावरिल समस्या आपोआप दुर होईल – वाचाल तर वाचाल

Shares

नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आपली हजारों वर्षांपासूनची शेतीपरंपरा ही आपल्या पुर्वजानीं सांभाळून ठेवली आहे व जोपासली होती. त्यातच त्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे. जमिनीची सुपिकता नैसर्गिकरित्या टिकवण्याच्या पारंपारिक पध्दतीला ही मंडळी आजही चिकटून आहेत. कुठलाही आधुनिक विचार किंवा आधुनिक तंत्राची शेती ते स्वीकारायला तयार नाहीत. कारण त्यांच्या शेतामध्ये पिकवली जाणारी अन्नधान्याची प्रत व चव इतरांपेक्षा वेगळी आहे. या शेतीपध्दतीत पिके, जनावरे व मानवी टाकाऊ वस्तू व पदार्थ पूर्णपणे कुजवून नंतरच शेतीत टाकले जातात. पिकाऊ क्षेत्र करून, लोकसंख्या भरपूर तरीही या लोकांना आजच्या परिस्थितीत काहीच कमी पडत नाही. साहजिकच पिके चांगली राहतात व वाढतात. कुठल्याही प्रकारची रोगराई दिसत नाही. यालाच परिपूर्ण शाश्वत शेती तंत्र म्हणावे लागेल. कारण हे लोक साठ मैल एका दमात पायी प्रवास करून त्याच दिवशी आपल्या घरी परततात. अशी शारीरिक क्षमता आजतरी कोणत्याही जमातीत शिल्लक नाही. प्राणवायू, शुध्द हवा, सूर्यप्रकाश, पाणी हेच सुपीक जमिनीचे महत्वाचे घटक आहेत.

गव्हाच्या पिठाच्या किमती 5-6 रुपयांनी कमी होणार, सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार

पिकावर दिसून येणारे निरनिराळे रोग हे अनेक सूक्ष्म जंतुंच्या कारणामुळे निर्माण होतात. हे सूक्ष्म जंतू हवेतून, पाण्यातून, जमिनीतून अथवा अनारोग्य परिस्थितीत सडणाऱ्या पदार्थाच्या सानिध्यातून पिकावर येतात व त्याच्यावर हल्ला करू शकतात. जमिनीत वास्तव्य करणारे अनेक तऱ्हेचे सूक्ष्म जंतू पिकावर येणाऱ्या रोगास कारणीभूत होऊ शकतात. हे सूक्ष्म जंतू जमिनीत अनेक वर्षे राहू शकत असल्यामुळे पिकाच्या वाढीच्या दृष्टीने बरेच घातक ठरू शकतात. त्यामुळे पिकाचे खूप नुकसान होऊ शकते. सूक्ष्म जंतुंच्या हल्ल्यामुळे मुळांच्या जमिनीतील वाढीवर व कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतो. निसर्गामध्ये निरनिराळ्या वनस्पती वाढत असताना, त्यात विशिष्ट तऱ्हेचे सेंद्रिय पदार्थ तयार होतात. हे सेंद्रिय पदार्थ रोग निवारण करण्यास खूप मदत करतात. पीक उत्पादनवाढीच्या प्रयत्नात जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवून पिकाला संरक्षण देणे आवश्यक असते.

पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व – शिका आणि शिकवा

सेंद्रिय पदार्थ जमिनीत घातल्यावर सूक्ष्म जिवाणूंद्वारे त्यांचे विघटन होऊन त्यामुळे विशिष्ट तऱ्हेने नवीन रासायनिक विषारी घटक तयार होतात. ते रोगाचे निवारण करतात. अथवा रोगाचे निवारण प्रतिस्पर्धक निर्माण करून, नत्राचे स्थिरीकरण कमी करून, जमिनीच्या आर्द्रतेत वाढ करून, सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढवून, ॲक्टिनोमायसीनचे प्रमाण वाढवून अशा अनेक मार्गाने रोग, कीड यांचे आपोआप नियंत्रण केले जाते. यादृष्टीने जमिनीचे • सुयोग्य नियोजन असेल तर कुठल्याही प्रकारच्या कीडरोगांची काळजी करण्याचे कारण रहात नाही. अन्न हेच औषध असावे आणि आपले औषध हेच आपले अन्न असावे यापद्धतीने वनस्पतीशास्त्रामध्ये आयुर्वेदाच्या सहाय्याने अमलात क्रांती करता येईल.

माती परीक्षण म्हणजे शेती ची गुरूकिल्ली – एकदा वाचाच

ओल्या व वाळलेल्या वनस्पती किंवा त्यांची चुर्ण यापेक्षा वनस्पतींचे अर्क यांना अधिक मागणी आहे. त्यामध्ये वनस्पती अर्काचेही प्रमाणीकरण करावे लागते. त्यामध्ये आवश्यक घटक कोणते व किती प्रमाणात आहेत हे पहावे लागते. वैदीक तंत्रामध्ये तणांचा वापर करून चांगल्या प्रकारचे कीड व रोगनाशक बनविता येते. तश्याच प्रकारे औषधी वनस्पतीच्या अर्कापासून रोग व कीटकनाशके बनविता आली पाहिजेत. जेव्हा फुलं पूर्ण बहाराला आली की त्यांच्या अर्कापासून मानसिक शक्ती प्राप्त करून देणारी पुष्पौषधी तयार केली. आपल्याकडे तेरडा, मोरवेल यापासून अशी औषधे तयार करता येतात. आणि वनस्पीच्या विकारासाठीही काही औषधे तयार करता येतात.

निसर्ग हा जिवाणुच्या मदतीने चालवतो नत्राचे चक्र – वाचाल तर वाचाल

औषधी जशी माणसांना उपयुक्त आहेत तशीच जनावरे नी किंवा वनस्पतींना उपयुक्त आहेत. उदा. एखाद्या झाडाला कलम केले तर त्या झाडावर आघात होतो. त्यातून त्या झाडाला सावरायला ‘उपयोगी पडेल किंवा झाडाला कीड लागली तर क्रॅब अॅपल त्याला किडीपासून वाचवेल. शेवटी निसर्ग हा अजब गारूडी आहे. त्याला गुरू करून अनेक पीक वाढीतील समस्या दूर करता येईल.एखाद्या भागात ज्या प्रकारचे आधार आढळतात त्या आधारावर उतारा देणाऱ्या वनस्पती तिथल्या निसर्गात असतात. त्यामुळेच तणांचा कीटकनाशक व रोगनाशक म्हणून उपयोग होऊ शकतो. वनस्पतींनी स्वतःच्या संरक्षणासाठी निर्माण केलेल्या औषधी द्रव्याचा वापर प्रगत मेंदूचा मानव स्वतःच्या आरोग्य रक्षणासाठी करतो.

स्वातंत्र्य ते आर्थिक स्वातंत्र्य, अन् कर्जमुक्ती ते सुराज्य, यासाठी स्वतंत्र” शेतकरी मंत्रालय” व्हावे !

मग तोच उपाय रोगट वनस्पतींना का चालू नये ? उदा. मशरूम हा अत्यंत प्रसिद्ध, औषधी, गुणकारी बुरशी गटातील वनस्पतीजन्य घटक आहे. आदिवासी व डोंगर दऱ्यात राहणारे लोक मशरूम अन्न व औषध म्हणून उपयोग करीत आले आहेत. यांग जोन यांनी चिनी औषधांमध्ये विविध मशरूमचे महत्व व उपयोग सांगितले आहेत. हँग यांनी मशरूमचे औषधी घटक व गुणधर्म निश्चित केले आहेत. त्यांचा उपयोग वनस्पतीजन्य रोगकिडीवर व्हायला हरकत नाही. मशरूमपासून अॅन्टीबायोटिक्ससारखी औषधे निर्माण करता येतात हे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. कारण रिशी मशरूममध्ये एच. आय. व्ही. प्रतिबंधक, हिपॅटायटीस बी प्रतिबंधक तत्त्व आढळून आले आहे. मलेरिया एन्फ्ल्यूएन्झा यावर मशरूम परिणामकारक आहेत. रिशी व मैटाके मशरूममध्ये प्रतिजैव घटकांची खाण आहे. मशरूममध्ये मानव प्रतिरक्षा यंत्रणा पुनरुज्जीवीत करण्याचा महत्वाचा गुणधर्म आहे. मग याचा उपयोग वनस्पतीवर केल्यास निश्चितपणे चांगले निष्कर्ष मिळू शकतील.

मातीची जैविक क्षमता टिकवणे आज का महत्त्वाचे – एकदा वाचाच

औषधी वनस्पतीमधील असणाऱ्या औषधी तत्व म्हणजे अल्कोलाईडस्, स्टेरॉइडस्, ग्लायकोसाइडस् वनौषधीमधून वेगळी काढण्यासाठी क्लिष्ट प्रक्रिया असून त्याकरीता आधुनिक तंत्र व उपकरणाची गरज भासते. सुगंधी तेल काढण्यासाठी पाण्याद्वारे ऊर्ध्वपातन, वाफेद्वारे ऊर्ध्वपातन, पाणी व वाफेद्वारेपातन, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन पद्धत(इथर, अल्कोहोल, क्लोरोफार्म, हेक्झेन इ. चा वापर). झाडाला चिरा देणे, आसव/अरिष्ठ/अर्क तयार करणे, आसव व आरिष्ठ ही वनस्पतींच्या मुरवणीद्वारे तयार करतात.असे पदार्थ एका ठराविक प्रमाणात साखरेच्या द्रावणात मिसळून काही दिवस पद्धतीने आंबवण्याची प्रक्रिया करावी लागते.वनस्पतीतील औषधी गुणधर्म उतरतात.हे सेंद्रिय पदार्थ काही रोगांवर त्यांचे निवारण करण्यासाठी खुप मदत करतात….

धन्यवाद

शिका आणि शिकवा

लेखक — मिलिंद जि गोदे

milindgode111@gmail.com

आपल्या विचारांची फक्त दिशा बदला आपल्या जिवनाची दशा आपोआप बदलेल….

9423361185

गुप्त नवरात्रीच्या समाप्तीपूर्वी तुमच्या इच्छेशी संबंधित हे उपाय निश्चित करा.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *