होय… कलिंगड वजन कमी करण्यास मदत करते
सर्वात जास्त पाण्याचे प्रमाण असणारे फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास कलिंगड मदत करते आणि त्यामुळे पोट थंड सुद्धा राहते. कलिंगड अनेक आजारांपासून दूर ठेवते तर अनेक आजार कमी करते. वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यायाम, पण खूप वेळ व्यायामामुळे मासपेंशीवर जोर येतो आणि मग त्रास होतो. अशात कलिंगड हे शरीरासाठी खूप चांगले आहे. कलिंगड वजन कमी करण्यास अजून कसे मदत करते हे आपण बघुयात…
१. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात.
२. कलिंगडच्या बियांमध्ये लोह, झिंक, फायबर आणि प्रोटीनसोबत मायक्रोन्यूट्रियंटस असतात. त्यामुळे त्यांच्या बिया सुद्धा वजन कमी करण्यास मदत करतात.
३. मधुमेहासाठी तर कलिंगड उपयोगी आहेच, पण वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते.
४. जर कलिंगडामध्ये ४ ग्रॅम कॅलरीज आहे, तर त्यांच्या बियांमध्ये फक्त २२ कॅलरीज असतात.
५. कलिंगड मध्ये एल-सायट्रिलीन नावाचा एक घटक असतो, ज्याला आपले शरीर एल-आर्जिनिन नावाच्या अमिनो ॲसिडमध्ये बदलते. हे ॲसिड फक्त ब्लड सर्क्युलेशनमध्ये मदत करतं असं नाही, तर रक्त वाहिन्यांना मोकळे करण्यास देखील मदत करते.
६. वजन कमी करण्याबरोबरच हे शरीरासाठी खूप चांगले आहे. आपल्या त्वचेवर सुद्धा यामुळे उजाळा येतो आणि त्वचा चांगली राहते.