हिवाळ्यात कशी घ्यावी द्राक्षाची काळजी
सप्टेंबर चा शेवट आणि ओक्टोम्बर ची सुरुवात हा काळ द्राक्ष मणी वाढण्याचा असतो. आपल्याकडे ओक्टोम्बर पासून थंडी पडण्यास सुरुवात होते . या वेळेत सर्वात जास्त लक्ष द्राक्ष बागेकडे द्यावे लागते. कारण थंडीच्या काळात मण्यांची वाढ हळुवारपणे होत असते. झाडाची वाढ योग्य प्रमाणात होत नाही त्यामुळे द्राक्ष बागेचे व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते.
थंडीत द्राक्ष बागेचे व्यवस्थापन कसे करावेत –
१. थंडीच्या काळात पांढऱ्या मुळांची वाढ चांगली आणि सतत ठेवावीत.
२. पांढऱ्या मुळांच्या क्षेत्रात पाण्याचा ताण न पडता कसे ते वाफसा राहील याची काळजी घेतली पाहिजे .
३. या दिवसात अन्नद्रव्यांचा पुरवठा नीट होत नसल्याने आच्छादनाचा वापर करावा .
४. अमिनो ऍसिडची फवारणी करावी .
५. जमिनीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट चा वापर ठिबकद्वारे करावा .
६. मणी वाढीच्या काळात पाटाने २ ते ३ वेळा पाणी द्यावे.
आच्छादनाचा फायदे –
१. आच्छादनामुळे तणांची वाढ थांबून अन्नद्रवेचा अधिक कार्यक्षमतेने वापर होतो.
२. उत्पादनामध्ये वाढ दिसून येते.
३. वेलींचे पोषण चांगले होते.
४. मुळांच्या जवळपास असणाऱ्या मातीचे तापमान कमी जास्त होत नाही.
५. मुळे कार्यशील राहतात.
हिवाळ्यामध्ये द्राक्ष वाढीसाठी आच्छादन करणे गरजेचे असते जेणेकरून थंडीमुळे होणाऱ्या नुकसानापासून पिकांचे संरक्षण होईल आणि त्यांची वाढ खुंटणार नाही.