इतर बातम्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा भीतीदायक आकडा !

Shares

मराठवाड्यास दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जाते. परंतु सध्या मराठवाड्यात चिंतेचा मोठा विषय शेतकऱ्यांची आत्महत्या हा आहे. शेती व्यवसायात विविध नवनवीन बदल होत आहेत. अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून शेती उत्पादनात वाढ होत आहे मात्र नैसर्गिक संकटांपुढे शेतकरी हतबल झाला आहे. नैसर्गिक संकटाने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यामधील तब्बल ८०५ शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे. यावरून मराठवाड्याची खरी परिस्थिती नेमकी काय आहे हे दिसून येते. ८०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यातील ६०५ शेतकऱ्यांची आत्महत्या ग्राह्य धरण्यात येत आहे तर ११५ आत्महत्येवर अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही.

कर्जमाफी करूनही आत्महत्येचा आकडा वाढला ?
मागील वर्षी २०२० मध्ये मराठवाड्यामधील ८ जिल्ह्यातील ७७३ शेतकऱ्यांनी विविध कारणामुळे आपला जीव दिला होता. परंतु सरकारने यावेळेस कर्जमाफी करून देखील आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मराठवाड्यातील ६१७ शेतकऱ्यांचे कुटुंब मदतीसाठी पात्र झाले होते तर ११० शेतकरी कुटुंब अजूनही प्रलंबितच आहेत.

काळोख्यातले दोन महिने ..
१ जानेवारी पासून १२ डिसेंबर पर्यंतचा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आकडा पाहता नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टी, अवकाळ यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एकट्या बीडमध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यात ५२ आत्महत्या केलेल्या घटना समोर आल्या आहेत. पिकाचे नुकसान ज्या महिन्यात झाले त्याच महिन्यात आत्महत्या जास्त संख्येने झाल्या आहेत.

आत्महत्येचे प्रमुख कारणे काय ?
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी केंद्र तसेच राज्यसरकार विविध नवीन योजना राबवत असते. नवनवीन तंत्रामुळे शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. मात्र निसर्गाच्या पुढे शेतकऱ्यांनी पाय टेकले आहे. शेतमालाला योग्य दर न मिळाल्यामुळे तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडावे या चिंतेमुळे शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे अनेक शेतकरी कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले आहे.
शेतकऱ्यांच्या वारसाला ७० हजार मुदत ठेव तर ३० हजार रुपये रोख असे १ लाख रुपये सरकारकडून देण्यात येते. या रकमेमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जाते आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *