हरभरा लागवड पद्धत
रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पीक म्हणजेच हरभरा. हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात करता येते. महाराष्ट्रात अंदाजे १८.२० लाख हेक्टर क्षेत्र हरभरा पिकाखाली आहे. हरभऱ्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. संपूर्ण भारतभर हरभऱ्याची मागणी बाराही महिने असते. हरभरापासून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर आपण सुधारित जातीच्या बियाणांचा वापर करून योग्य पद्धतीने लागवड केली पाहिजे.सुधारित वाणांमध्ये सुद्धा उच्च आणि दर्जेदार बियाणे वापरणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात हरभरा लागवडीची योग्य पद्धत .
जमीन व हवामान –
१. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन हरभरा लागवडीसाठी उत्तम ठरते.
२. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ च्या दरम्यान असावा.
३. भरड किंवा हलकी हलकी , पाणथळ , क्षारयुक्त जमीन हरभरा पिकासाठी वापरू नये.
४. स्वच्छ सूर्यप्रकाश , थंड व कोरड्या हवामानत हरभरा पीक घेणे फायद्याचे ठरते.
५. या पिकाच्या वाढीसाठी सर्वसाधारण १५ ते २५ अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान मानवते.
पूर्वमशागत –
१. जमीन खोल नांगरून कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभूशीत करून घ्यावीत.
२. जर खरीपात मूग व उडीत पीक घेतले असेल तर काढणीनंतर वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन पेरणी करावीत.
३. वखराच्या शेवटच्या पाळीपूर्वी प्रति हेक्टरी १० ते १५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावेत.
४. कोरडवाहू क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.
५. बागायती शेतीसाठी पेरणी १ ओक्टोम्बर ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान करावीत.
६. कोरडवाहू क्षेत्रात बियाणे ५ से. मी खोलीवर बी पॆरून टोकण किंवा पाभरी पद्धतीने पेरणी करावी.
७. लहान दाण्याच्या वाणाकरिता हेक्टरी ६० ते ६५ किलो बियाणे वापरावेत.
८. मध्यम आकाराच्या वाणासाठी ७० किलो बियाणे वापरावेत.
९. टपोऱ्या आकाराच्या वाणासाठी १०० किलो बियाणे वापरावेत.
१०. पेरणी करत असतांना २ ओळीतील अंतर ३० से. मी ठेवावेत तर २ झाडांमधील अंतर १० से. मी ठेवावेत.
बियाणे –
१. पायाभूत बिजोत्पादनसाठी मूलभूत बियाणे वापरावेत.
२. प्रमाणित बिजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावेत.
३. बियाणे नेहमी मान्यताप्राप्त दुकानदाराकडून खरेदी करावेत.
४. बियाणांच्या पिशवीवरील खूणचिट्ठी म्हणजेच टॅग पाहून त्यावरील बियाणे परिक्षणाची तारीख ( एक्सपायरी डेट ) तपासून घ्यावीत.
५. बियाणे खरेदी केल्याची पावती घेणे विसरू नये. पावतीवरील खरेदी तारीख , पिकाची जात आदी माहिती तपासून घ्यावी.
६. बियाणांचा थोडा नमुना पिशवीत शिल्लक ठेवावा.
७. बियाणांची पिशवी फोडताना त्यावरील खूणचिट्ठी म्हणजेच टॅग त्यावरच राहील याची दक्षता घ्यावी.
८. बियाणे पेरणीकेल्यानंतर ७ दिवसाच्या आत बीजोत्पादन क्षेत्राची जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणेकढे नोंदणी करणे आवश्यक आहे.
बीजप्रक्रिया –
१. बियाण्यांची चांगली वाढ होण्यासाठी व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम बाविस्टीन किंवा ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची प्रती किलो बियाणे या नुसार बीजप्रक्रिया करावी.
२. हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र शोषणाचे कार्य वाढावे यासाठी २० ते २५ ग्रॅम प्रति किलो रायझोबियम जीवाणू संवर्धनाची बीज प्रकिया करून घ्यावी.
३. यानंतर बीज सावलीत पूर्णपणे वाळवून घ्यावे त्यानंतर लगेचच पेरणी करावी.
४. पायाभूत बीजोत्पादनासाठी १० मी. तर प्रमाणित बीजोत्पादनासाठी ५ मी. विलगीकरण अंतर ठेवावेत.
५. प्रमाणित बीजोत्पादनासाठी ५ मी. विलगीकरण अंतर ठेवावेत.
भेसळ काढणे –
१. मूळ झाडे आणि भेसळीची झाडे ओळखण्यासाठी तुम्ही बीजोत्पादनासाठी घेणाऱ्या वाणाच्या गुणधर्माची माहिती असणे आवश्यक आहे.झाडाची उंची , रंग , पानांची लांबी , फुलाचा रंग , घाट्याचा आकार यावरून गुणधर्माची पडताळणी करता येते.
२. भेसळयुक्त झाडे निदर्शनात आल्यास रोगग्रस्त झाडे पीक पीक फुलवऱ्यात येण्यापूर्वी नष्ट करावीत. जेणेकरून बियाणांची अनुवांशिक शुद्धता टिकून राहील.
क्षेत्रीय तपासणी –
१. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून बीजोत्पादन क्षेत्राची २ वेळेस तापासणी करून घ्यावी.
२. पहिली तपासणी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी करावी.
३. दुसरी तपासणी पीक फुलवऱ्यात असतांना करावीत.
४. क्षेत्रीय तपासणीच्या वेळेस उत्पादकास हजर राहणे गरजेचे आहे.
५. तपासणीच्या वेळेस दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन केल्यास बीजोत्पादन क्षेत्र पात्र ठरते.
रासायनिक खते –
१. हरभरा पिकामध्ये हवेतील नत्र शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे या पिकास प्रती हेक्टरी २५ कि.ग्रॅ. नत्र व ५० कि.ग्रॅ. स्फुरद द्यावेत.
२. डायअमोनिअम फॉस्फेट च्या माध्यमातून खतांची मात्रा देता येते.
पिक व पाणी व्यवस्थापन –
१. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम थाायरम + २ ग्रॅम बाविस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करून २५० ग्रॅम रायझोबियम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे.
२. पहिली पाण्याची पाळी पीक फुलवऱ्यात असतांना द्यावीत.
३. दुसरी पाण्याची पाळी घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावीत.
४. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तर दोन ऐवजी तीनवेळा आवश्यकतेनुसार पाणी द्यावेत. सर्वसाधारणपणे हरभरा पिकास २५ सेमी पाणी लागते.
५. हरभरा पिकास सिंचन पद्धतीने पाणी देणे फायदयाचे ठरते तसेच सुधारित वाणाच्या उत्पादनात मोठ्या संख्येने वाढ होते
आंतरमशागत –
१. हरभरा पिकाच्या वाढींसाठी व शुद्ध बियांचे उत्पादन होण्यासाठी पीक पेरणीपूर्वी ६० दिवस तणरहित ठेवावेत.
२.पहिली खुरपणी व कोळपणी पेरणीनंतरत २० ते २५ दिवसात करावी.
३. दुसरी खुरपणी व कोळपणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी करावी.
४. कोळपणी नंतर जमीन भुसभुशीत होते , बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो.
५. खुरपणी मजूर अभावी शक्य नसेल तर तणनाशकांचा वापर करावा. उगवणीपूर्वी फ्ल्युक्लोरॅलिन अथवा पेंडीमिथिलिन प्रति हेक्टरी 25 मि.ली.10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
पीक संरक्षण –
१. हरभरा पिकाचे सर्वात जास्त नुकसान घाटे अळीमुळे होते.या किडीचे एकात्मिक कीड नियंत्रण करावे लागते. दर २० मी . अंतरावर आडव्या काठीला उभी काठी बांधून उभे करावेत जेणेकरून त्यावर बगळे , साळुंखी , चिमण्या बसून अळ्या पकडून खातील.
२. प्रति हेक्टरी प्रमाणे ५ कामगंध सापळे लावावेत.
३. पीक ३ आठवड्याचे झाले असता पानांवर पांढरे डाग , शेंडे खाल्लेले आढळून आल्यास त्यावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
४. जास्त नुकसानीची पातळी दिसत असेल तर पाण्यातून ५ टक्के पेक्षा जास्त दिसल्यास २० टक्के प्रवाही रेनॉक्झीपीर (कोराजन) ९० मिली अथवा ४८ टक्के प्रवाही फ्ल्युबेंडामाईड (फेम) १२५ मिली अथवा दाणेदार ५ टक्के ईमामेक्टीन बेंझोएट (प्रोक्लेम) २०० ग्रॅम प्रति हेक्टर करीता ५०० लिटर फवारावेत.
काढणी, मळणी आणि साठवणूक –
१. हरभरा पिकाच्या काढणीस उशीर झाल्यास घाटे गळण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हरभरा पिकाचे पाने आणि घाटे वाळल्यानंतर त्यांची काढणी करावीत.
२. पीक काढणीनंतर खळ्यावर चांगल्याप्रकारे वाळू द्यावेत. नंतरच ट्रॅक्टरने किंवा मळणी यंत्राने मळणी करावीत.
३. मळणीच्या वेळेस इतर बियाणांची भेसळ होऊ नये याची दक्षता घ्यावीत.
४. मळणीचे यंत्र , मळणीची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी.
५. मळणीनंतर बियाणे चांगल्याप्रकारे वाळवून घ्यावेत.
६. जास्तीत जास्त ९ टक्क्या पर्यंत बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण असावेत.
७. तयार झालेले बियाणे स्वच्छ पोत्यात भरावेत आणि नजीकच्या बीज प्रक्रिया केंद्रावर जमा करावेत.
अश्या प्रकारे हरभऱ्याच्या लागवडीची योग्य पद्धत निवडली तर तुम्हाला जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेण्यास नक्की मदत होईल.