सरकारचा तेलबियांच्या साठ्यावर कडक निर्बंध, परिणाम सोयाबीनच्या दरावर ?
मागील काही दिवसांपासून शेतमालाच्या दरात वाढ होतांना दिसत आहे. तर आता रशिया आणि युक्रेन यांच्यामधील तणावाचा खाद्यतेलाच्या किमतींवर परिणाम झाला असून एका किलोमागे २० रुपयांनी वाढ झाली आहे.
केंद्र सरकारसह राज्य सरकारने खाद्यतेलासह तेलबियांच्या साठ्यावर निर्बंध घातले आहेत. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही बंदी तात्काळ उठवण्याची मागणी केली, जी शेतकऱ्यांसाठी घातक असून आता भाव वाढीची भीती व्यापाऱ्यांना देखील होत आहे.
तेलबियाणांच्या साठवणुकीवर निर्बंध …
मागील १० ते १२ दिवसांपासून खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. देशामध्ये सूर्याफुल, सोयाबीन, पाम तेल यांची निर्यात होत असते तर धुळे, नाशिक, गुजरात , सटाणा येथून भुईमूग विक्रीसाठी उपलब्ध होते.
आंतराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्यामुळे सरकारने तेलबियाणांच्या साठवणुकीवर निर्बंध लावले असून हे निर्बंध ३० जूनपर्यंत लागू राहतील. तर ज्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी असे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी निर्देश दिले आहे.
बंदीच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत स्टॉक एका मर्यादेपर्यंत कमी करणे आवश्यक असून खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास, तपशील अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या https://evegoils.nic.in/ या वेबसाइटवर उपलब्ध करून द्यावा लागेल.
सोयाबीनचे भाव वाढत असल्याने तेलबियांच्या साठ्यावरील मयदिची मुदत वाढविली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल चार ते पाच हजार तर एकरी २५ ते ३० हजारांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. असे श्री. घनवट यांचे म्हणणे आहे.