शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दरात वाढ
सोयाबीन हंगाम सुरु झाल्यापासून अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला असून टप्याटप्याने सोयाबीन विक्रीस सुरुवात केली होती. खरीप हंगामात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे सर्वकाही बाजारपेठेच्या दरावर अवलंबून होते. मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर ६ हजार ५०० वर होते आता ६ हजार ७५० झाला आहे.
हे ही वाचा (Read This ) बर्डफ्लूमुळे ३ दिवसात ३१ हजार कोंबड्यांचा मृत्यू
सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होत असतानाचे चित्र आपल्याला बघायला मिळाले. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. त्यामुळे सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाली होती मात्र त्यानंतर पुन्हा सोयाबीनचे दर घसरले होते.आता सोयाबीनच्या अंतिम टप्यात असून साठवणुकीचा फायदा आता सोयाबीन शेतकऱ्यांना होतांना दिसत आहे.
सोयाबीनचे दर ७ हजाराच्या मार्गावर
मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीनला अगदी कवडीमोलाचा दर मिळत होता. मात्र १५ दिवसांपासून दरात वाढ होऊन दर हे ६ हजार ५०० वर स्थिर होते. त्यामुळे आता दरात अजून वाढ होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र शेतकऱ्यांनी संयमाने निर्णय घेऊन संपूर्ण सोयाबीन विक्रीस न काढता टप्याटप्याने विक्री करणे सुरु ठेवले त्यामुळे आता सोयाबीनच्या दरात २५० रुपयांनी वाढ होऊन सध्या दर ६ हजार ७५० एवढा झाला आहे.आता पुढे अजून दर वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.