अद्रकाचे उत्पादन भरगोस , भाव मात्र कवडीमोल !
अद्रकाचे
सततच्या बदलत्या वातावरणामुळे तसेच भाजीपाला, फळे यांच्या बदलत्या दरामुळे शेतकरी आधीच त्रासलेला आहे. या वेळेस शेतकऱ्यांवर आसमानी , सुलतानी असे दोन्ही संकट एकालागोपाठ आलेले आहेत. शेतकऱ्यांना अगदी कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. काही पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात झाले तर काही पिकांचे उत्पादन अगदीच नाहीच्या बरोबर झाले आहे. त्यात अद्रक , पपई चे विक्रमी उत्पादन मिळालेले आहे. परंतु या विक्रमी उत्पादनाचा आनंद शेतकऱ्यांना झालेला नाही. याचे कारण म्हणजे अद्रक , पपई ला चांगला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे चांगले उत्पादन मिळवूनही शेतकऱ्याच्या पदरी काहीही पडलेले नाही.
मराठवाड्यात तर चक्क अद्रकची खरेदी देखील होत नाही तर फक्त ७ रुपये किलोने अद्रक विकला चालला आहे. शेतकऱ्यांनी अद्रकच्या बियाण्याची खरेदी ४० रुपये प्रति किलोने केली असून बाजारभाव मात्र ७ रुपये प्रति किलो मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरवेळी अद्रकला मोठ्या संख्येने मागणी असते परंतु या वेळेस अद्रकच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये यावेळेस अद्रकचे उत्पादन मोठ्या संख्येने झाले आहे. तरीही त्याचा काहीही फायदा झालेला नाही. अद्रकचे बियाणे ४ क्विंटल प्रमाणे खरेदी केले होते. मात्र त्याची विक्री ७०० रुपये क्विंटलने होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. आता शेतकऱ्यांना अद्रक कुठे आणि कशी विकावी असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणून अद्रकची लागवड केली होती. यावेळेस पाऊस जास्त पडला होता त्यामुळे अद्रकचे उतपादन जास्त आणि चांगले आले आहे. परंतु याचा काहीही फायदा झालेला नाही. यावेळेस अद्रक लागवडीचा खर्च निघेल की नाही अशी शंका येत आहे.