आगळ्यावेगळ्या निळ्या रंगाच्या बटाट्याची लागवड करून मिळवा अधिक नफा
सध्या अनेक शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. असाच एक आगळावेगळा प्रयोग एका शेतकऱ्याने केला आहे. त्याने निळ्या रंगाच्या बटाट्याचे पीक घेतले असून त्याने या बटाट्याला नीलकंठ नाव दिले आहे. या शेतकऱ्याचे नाव मिश्रीलाल राजपूत असून राहता भोपाळचा आहे.
हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग
त्यांनी बटाट्याची ही जात केंद्रीय बटाटा संशोधन संथ शिमला येथून आणली होती. चला जाणून घेऊयात या निळ्या बटाट्याची माहिती.
- निळे बटाटे हे चवीला अगदी चविष्ट आहेत.
- या बटाट्यांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म दडलेले असून हे आरोग्यासाठी उत्तम ठरते.
- निळ्या बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडेन्ट आढळतात.
- हे सामान्य बटाट्यापेक्षा लवकर शिजवलेले जाऊ शकते.
- या जातीच्या १०० ग्रॅम बटाट्यामध्ये अँथासायनिन मूलद्रव्याचे प्रमाण १०० मायक्रोग्रॅम आणि कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण ३०० मायक्रोग्रॅमपर्यंत असते.
हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा
या जातीच्या बटाट्याचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून घेणार आहेत. आणि मग मिश्रीलाल या बटाट्याची व्यापारासाठी लागवड करणार असल्याचे सांगितले गेले आहे.