गारपीटीनंतर पिकाचे व्यवस्थापन कसे करावेत ?
अति थंडीच्या दिवसात तसेच अवकाळी पडलेल्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अश्या परिस्थितीत पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. आपण आज गारपीटात पिकाचे संरक्षण, व्यवस्थापन कसे करावे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
कांदा पीक –
१. गारपीटामुळे कांद्याच्या पातीस बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.
२. त्यासाठी कॉपर हायड्राऑक्सिड २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
३. फुलकिडे, फळ पोखरणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ०.३ मी. लि . प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावेत.
४. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बेनोमिल ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
वेलवर्गीय भाजीपाला –
वेलवर्गीय भाजीपाल्याच्या भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी १ मी.ली. हेक्झाकोनॅझॉल प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
पेरू-
१. फांद्या मोडून फांद्या, फळांना इजा झाली असेल तर २.५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावेत.
२. देवी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास २ ग्रॅम कॉपर हायड्रॉक्सइड २५० पीपीएम स्ट्रेप्टोसायक्लीन मिसळून फवारावेत.
३. ताणावर बाग सोडण्यापूर्वी अतिरिक्त पालाश व स्फुरद द्यावे.
आंबा –
१. आंबा बागेतील फळगळती थांबविण्यासाठी १३:००:४५ हे खत १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावेत.
२. फुलकिडी तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी १ मी. ली. हेक्साकोनॅझोल १.५ मी.ली. फीप्रोनील प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.
ऊस –
१. उसाच्या पानांचे नुकसान झाले असल्यास जमिनीतून ५० किलो अमोनिअम सल्फेट एकरी याप्रमाणे द्यावे.
२. पानांवर १९:१९:१९ १ किलो , युरिया १ किलो प्रति एकर याप्रमाने फवारणी करावीत.
३. ठिबक सिंचनसेल तर पिकाच्या वाढीचा विचर करून दक्षतेपूर्वक खत द्यावे.
गारपीटामध्ये पिकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.