आरोग्यपिकपाणी

गाजर पिकांची लागवड आणि आरोग्याचे फायदे…

Shares

गाजर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात.गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात.रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्ही हृदयविकार, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून दूर राहू शकता.

जमीन आणि हवामान

१. गाजर लागवडीसाठी निवडलेली जमिन मऊ भुसभुशीत असावी भारी जमिनीची मशागत व्‍यवस्थित करुन जमिन भुसभुशीत करावी.
२. . गाजराच्‍या लागवडीसाठी खोल भुसभुशीत गाळाच्या जमिनी बरोबरच पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी, सामु ६ ते ७ असणारी जमिन निवडावी.
३. गाजर हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्‍यासाठी तापमान १५-२० अंश से. असावे लागते. १० ते १५ अंश से. तापमानाला तसेच २० ते २५ अंश से.तापमानाला गाजराचा रंग फिक्‍कट असतो.
४. ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या शेवटी व नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात गाजराची लागवड केल्‍यास जास्‍त उत्‍पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो.
५. परंतु गाजराची लागवड सप्‍टेबर ते डिसेंबर महिन्‍यापर्यंत करता येते. उत्‍तम वाढीसाठी १८ ते २४ अंश से. तापमान अतिशय पोषक आहे.

लागवड

१. गाजराच्‍या लागवडीसाठी जमिन खोल उभी – आडवी नांगरुन घ्‍यावी. जमिन सपाट करुन घ्‍यावी.
२. बी सरीवरंब्‍यावर पेरावी.
३. दोन वरंब्‍यातील अंतर ४५ सेमी ठेवावी बियाची टोकून पेरणी करतांना ३० ते ४५ सेमी अंतरावर सरी ओढून दोन्‍ही बाजूंनी १५ सेमी अंतरावर टोकन पध्‍दतीने लागवड करावी.
४. पाभरीने बी पेरतांना दोन ओळीत ३० ते ४५ सेमी अंतर ठैवावी आणि नंतर विरळणी करुन दोन रोपातील अंतर ८ सेमी ठेवावे.
५. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे ४ ते ६ किलो बियाणे लागते.
६. पेरणीपूर्वी बियाणे उगवून येण्‍यास पेरणीनंतर १२ ते १५ दिवस लागतात.
७. पेरणीपूर्वी बियाणे २४ तास पाण्‍यात भिजत ठेवल्‍यास हा काळ कमी करता येतो.

सुधारीत वाण

१. युरोपीय जाती – थंड हवामानात वाढणाऱ्या ह्या जाती द्विवर्षायू असतात या गाजरचा रंग केशरी किंवा नारंगी असून आकाराने सारख्या जाडीचे असतात.
२. पुसा केसरी-ही जात लोकल रेड आणि नँटेज या जातीच्या संकरातून विकसित करण्यात आली आहे. या गाजराचा रंग केशरी असून आतील भाग नरम असतो. त्यामध्ये जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. प्रति हेक्‍टर २५ टन इतके उत्पादन मिळते.
ही गाजरे काढायला उशीर झाला तरी ती तसेच्या तसेच राहतात पेरणीनंतर ८० ते ९० दिवसात गाजराचे पीक तयार होते.
३.नँटेज – या जातीचे गाजर मध्यम लांबीचे, टोकापर्यंत एक सारखे ,चांगल्या आकाराचे असतात. रंग एकसारखा नारंगी असतो.यात पाण्याचे प्रमाण कमी असून या गाजरावर तंतूमुळे नसतात. पेरणीपासून ७० ते १०० दिवसांत पीक तयार होते.
४. पुसाजमदग्री – हा वान ई.स-१९८१ नँटेज याच्या संकरातून विकसित केला आहे. गाजर १५ ते १६ सें.मी. लांब, केसरी रंगाचे निमुळते असते.
५. आशीयाई जाती- या जातीला चांगले व उष्ण हवामान असेल तर पीक लवकर वाढते. या गाजराचा रंग तांबडा, काळसर पिवळा असतो.

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन

१. गाजराच्‍या पिकाला दर हेक्‍टरी ८० किलो नत्र ६० किलो स्‍फूरद आणि ६० किलो पालाश द्यावे.
२. नत्राची अर्धी मात्रा आणि स्‍फूरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी.
३. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लोगवडीनंतर २० दिवसांनी द्यावी.
४. जमिनीच्‍या मगदुरानुसार २० ते ३० गाडया शेणखत जमिनीच्‍या पूर्वमशागतीच्‍या वेळी मिसळून द्यावे.
५. बियांची उगवण चांगली होण्‍यासाठी जमिन तयार झाल्‍यावर वाफे आधी ओलावून घ्‍यावेत आणि वाफसा आल्‍यावर बी पेरावे.
६. पेरणी केल्‍यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उगवण झाल्‍यावर नियमित पाणी देऊन पिकाच्‍या ५० दिवसाच्‍या कालावधीत जमिनीत चांगला आंलावा टिकून राहील याची काळजी घ्‍यावी.
७. हिवाळयात ७ ते ८ दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे.
८. गाजर काढणीपूर्वी १५ ते २० दिवस पाणी देणे बंद करावे म्‍हणजे गाजरात गोडी निर्माण होते.
९. पाण्‍याचे प्रमाण जास्‍त झाले तर गाजरात तंतुमय मुळांची वाढ जास्‍त होते.

काढणी उत्‍पादन आणि विक्री

१. गाजराची काढणी बियाणाच्‍या पेरणीनंतर ७० ते ९० दिवसात करतात.
२. गाजरे चांगली तयार व्‍हावीत म्‍हणून काढणीपूर्वी पिकाला १५ ते २० दिवस पाणी देण्‍याचे बंद करावे.
३. कुदळीने खोदून हाताने उपटून किंवा नागराच्‍या ससाहारूयाने गाजराची काढणी करावी.
४. गाजरावरील पाने कापून गाजरे पाण्‍याने स्‍वच्‍छ धुवून घ्‍यावीत.
५. लहान मोठी गाजरे आकारानुसार वेगळी करावीत.
६. गाजराचे उत्‍पादन हेक्‍टरी ८ ते १० टन इतके मिळते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *