शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार हातात , शासन निर्णय.
शेतकऱ्यांचे २०२० मध्ये झालेल्या पीक नुकसानीमुळे पीक कर्ज फेडता आले नाही. तर यावर्षी देखील म्हणजेच २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान निधी जमा होते मात्र शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीमुळे पैशांची गरज असते. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान निधी जमा होतो मात्र ते पैसे पीक कर्जाकडे वळवले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना एकही पैसा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे अनेक वेळा तक्रार केली होती. याच संदर्भात १५ डिसेंबर २०२१ रोजी शासनाने एक अतिशय महत्वाचे निर्देश देण्यात आले. शासनाने एक परिपत्रक जाहीर केले आहे.ते परिपत्रक पुढील प्रमाणे आहे.
शासन परिपत्रक-
१. महसूल व वन विभागाच्या क्रमांक २ अन्वये निर्देश देण्यात आले की मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत गारपीट व यावेळी पावसामुळे शेतीपिकचे तसेच बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याचे निधी वाटप करतांना विशेष दक्षता घ्यावी.
२. गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिके व वार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करतांना मदतीच्या रकमे मधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये.
३. याची अंबलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दखल घ्यावी.
शासन परिपत्रक कुठे मिळेल ?
https://www.maharashtra.gov.in/1125/Home या संकेतस्थळावर शासन परिपत्रक उपलब्ध आहे. याचा सांकेतांक 202112151514104702 हा आहे.