हंगाम संपत आला तरी ,ऊस अजूनही शेतातच उभा !
यंदा सर्व पिकांचे नुकसान झाले आहे, मात्र ऊस उत्पादनात वाढ झाली आहे. ऊस पिकास पोषक असे वातावरण मिळाल्यामुळे ऊस उत्पादन चांगले झाले आहे. शेतातील ऊस हा साधारणतः १२ महिन्यांमध्ये कारखान्यावर पोचवणे अपेक्षित असते. परंतु लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात १५ महिने उलटून गेल्यावर देखील ऊस हा शेतातच आहे अजूनही कारखान्यापर्यंत पोचलेला नाही. शेतकऱ्यांना शेतातील ऊस कारखान्यापर्यंत पोचवण्यासाठी अनेक कष्ट करावे लागत आहे. अनेक दिवसांपासून ऊस शेतात असल्यामुळे शेतीमधील ऊस हा उंदरे पोखरत आहेत तर काही उसांना तुरे फुटलेले आढळून येत आहे. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातच वेळेवर उसाचे गाळप झालेले नाहीत त्यामुळे ऊस उत्पादनात अधिक घट होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना करावा लागतोय दुय्यम संकटाचा सामना …
कारखानाच्या गट कार्यालयात शेतकरी सतत चकरा मारत आहेत. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस कारखाने उशिरा का होईना गाळप करतील की नाही अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यातही अनेक शेतकऱ्यांनी त्यांची नोंदणी केलेली नाही त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतांना दिसून येत आहे. अनेक कारखाने उसाला योग्य असा भाव मिळवून देतात. तर या वेळेस १३ ते १५ महिने झाले तरीही ऊस गाळपास घेऊन जात नसल्याने शेतकरी दुय्यम संकटात सापडला आहे.
ऊसाच्या उतारावर परिणाम…
ऊसाचे जर १० ते ११ महिन्यात गाळप झाले नाही तर त्याचा परिणाम उसाच्या उतारावर होतो. अश्यात शेतामध्ये चक्क १३ ते १५ महिन्यापासून ऊस उभा आहे. त्यामुळे ऊसाला तुरा फुटून त्यास पोंग फुटत आहे. याचा परिणाम उतारावर होत असल्याचे दिसून येत आहे. ऊस तोडीसाठी जर जातीस काळ झाला तर साखर कारखाने ऊस पिकाकडे दुर्लक्ष करू लागतात.
तालुक्यातील एकुलता एक कारखाना बंद ?
ऊस कारखान्यामध्ये शेतकरी चकरा मारून मारून थकला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात योग्य वेळी ऊसाची लागवड केली होती त्यामुळे शेतकऱ्यांचा उस हा आता आडवा पडला आहे. निलंगा तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तालुक्यामध्ये एक कारखाना आहे. मात्र अनेक महिन्यांपासून तो बंद आहे. त्यामुळे ऊस उत्पादक काळजीत पडला आहे.
हे ही वाचा.