इतर बातम्या

शेतकऱ्याची इमानदारी, खात्यात चुकून आलेले ९ लाख लगेच केले परत

Shares

शेतकरी आपल्या जीवाची ओढाताण करून शेती करत असतो. मात्र अनेकदा शेतकऱ्यांना या केलेल्या कष्टाचे मुबलक प्रमाणात फळ मिळत नाही. त्यांना नैसर्गिक तसेच आर्थिक अश्या दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागते. अश्यात त्यांच्या खात्यात लाखों रुपये जमा झाले तर?

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

जळगाव मधील विजय पाटील नावाच्या युवा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चुकीने ९ लाख रुपये जमा झाले होते. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचा मोह न बाळगता त्वरित संबंधितास सर्व पैसे परत केले. यामुळे सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे.
जळगाव येथील बी.जे मार्केटमधील अग्रवाल एजन्सीच्या खात्यातून त्यांच्या खात्यात ही रकम जमा झाली होती. मात्र त्यांनी लाखों रुपयांपेक्षा इमानदारीला अधिक महत्व दिले.

हे ही वाचा (Read Thisबदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे

सुरुवातीस विजय यांच्या खात्यात इतकी मोठी रकम जमा झाल्याचे त्यांना माहिती नव्हते. जितेंद्र अग्रवाल यांच्या लक्षात आले की, पैसे हे दुसऱ्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यानंतर त्यांनी विजय यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या शेतकऱ्याने कसलाही विचार न करता हे पैसे बँकेच्या शाखा व्यवस्थापक आणि सहायक शाखा व्यवस्थापक यांची भेट घेऊन परत केले.

या युवा शेतकऱ्याने लाखांपेक्षा इमानदारी भारी ही म्हण सिद्ध करून दाखवली आहे.

हे ही वाचा (Read This ) या पिकाची शेती करून दीड ते दोन वर्षात ६ लाख रुपये कमवा

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *