शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडवतोय, दरात मोठी घट जाणून घ्या आजचे दर
मागील २ महिन्यापासून कांद्याच्या दरामध्ये चढ उतार होत होती. तर मध्यंतरी दरात स्थिरता दिसत होती. मात्र आता कांद्याचा दर हा ३ हजार ५०० वरून थेट १ हजारांवर आला आहे.
कांद्याची सुरुवातीला विक्रमी आवक होत होती. तरीही दर मात्र चांगले मिळत होते. तर वाढत्या आवक मुळे २ महिन्यात ३ वेळा बाजारसमिती मधील व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. कांद्यास सध्या मिळत असलेल्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशाजन्य वातावरण निर्माण झाले आहे.
भविष्यामध्ये हे दर अजून कमी होतील की काय अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. चांगल्या कांद्यास १ हजार ६०० पर्यंतच भाव मिळत आहे.
कांद्याचे आजचे दर
झटपट कांद्याची विक्री
थोडा तरी चांगला दर मिळावा यासाठी शेतकरी रात्रंदिवस एक करून कांदा काढणी, छाटणीआणि लगेचच विक्री करत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये रात्रीतून ३०० ते ४०० ट्रक मधून कांद्याची आवक सुरु आहे.
ढगाळ वातावरण तसेच अवकाळी मुळे कांद्याची आवक कमी झाली होती. मात्र आता पुन्हा आवक वाढली आहे.
हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये
कांद्याबरोबर कलिंगडची आवक वाढली
हंगामी पिकांमध्ये कलिगड मोडले जात असून सध्या कलिगडची आवक जोरदार सुरु आहे. तर दुसरीकडे शेतशिवारात लागवड ही कायम आहे. कलिंगड ला सोलापूर बाजारसमितीमध्ये किमान १ हजार रुपये तर कमाल २ हजार ५०० रुपये असा दर मिळत आहे.
सर्वच पिकांचे गणित हुकले ?
यंदा कोरोना मुळे चांगले उत्पादन झालेल्या शेतमालाची विक्री झाली नाही तर नंतर खरीप हंगामात अवकाळी , अतिवृष्टी मुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता रशिया युक्रेन युद्धामुळे शेतमालाच्या किमतींमध्ये सतत चढ उतार होत असून सर्वच पिकाचे गणित हुकले. त्यामुळे शेतकरी आता त्रस्त झाला आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?