शेतकरी संघटनेचे नवीन ९ ठराव
कोरोनाचा परिणाम संपूर्ण जगामध्ये झालेला दिसून येत आहे. कोरोनामुळे अनेक कामांमध्ये शिथिलता निर्माण झाली आहे. कोरोनाचा अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष संघटना आता सक्रिय होतांना दिसून येत आहे. सोमवारी शेतकरी चळवळीची बैठक निफाड तालुक्यात झाली.ही बैठक शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी कायदा करावा या मागणीसह ९ ठराव मंजूर करण्यात आले. काय आहेत हे ९ ठराव आपण जाणून घेणार आहोत.
शेतकरी संघटनेचे ९ ठराव
१. केंद्र सरकारने उत्पादन खर्चाच्या साधरणतः दीडपट मूल्य निर्धारित करून शेतकरी हमीभावाचा कायदा पारित करावा.
२. वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांवर सक्तीची वीज बिल वसुली करत आहे. वीज वितरण कंपनीने असे करणे थांबवावे.
३. कर्नाटक मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना कारण्याऱ्यांवर कडक कार्यवाही करून या घटनेस समर्थन देणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबाई यांनी केलेल्या वक्तव्यावर निषेध ठराव करण्यात आला.
४. शासन स्तरावरील समस्या दूर करून निसाका सुरु काण्यात यावा असा ठराव करण्यात आला असून रानवड साखर कारखाना सुरु झाल्याबद्दल आ. दिलीप बनकर , पालकमंत्री छगन भुजबळ यांचे अभिनंदन केले.
५. शेतकरी , कामगार यांनी वैद्यनाथ साखर कारखाना, छत्रपती साखर कारखाना, द्वारकाधीश साखर कारखाना, संगमनेर साखर कारखाना यांच्याकडची थकीत रक्कम लवकरात लवकर अदा करावीत.
६. नाफेड कांदा खरेदीमध्ये व्यापारी, अधिकारी संगणमत करून घोटाळा करत आहेत का याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
७. नांदूरमध्यमेश्वरपक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे . त्यामुळे वन्यप्राणी अभयारण्य लावलेले बेकायदेशीर बोर्ड काढण्यात यावे असा ठराव करण्यात आला.
८. द्राक्ष बागायतदार संघाने ठरवलेल्या द्राक्ष दराची अंबलबजावणी व्हावी.
९. शेतकऱ्यांना बँकेने दिलेले कर्ज बेकायदेशीर असेल तर ते अनैतिक ठरवली पाहिजे.