शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , लवकरच येत आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर !
भारतात जसजशा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या तसतसा वाहनांचा खर्च देखील जास्त वाढत चालला आहे. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी अगदी झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत भारतात इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक मिनी बसेस, इलेक्ट्रिक मिनी ट्रक लॉन्च झाले असून आता भारतात सगळेच इलेक्ट्रिक होणार असे चित्र दिसत आहे, अशी माहिती भारताचे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. येणाऱ्या काही दिवसात एक बॅटरी ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करणार यामुळे कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती घडून येईल आणि शेतकऱ्यांना उत्पन्नात दुपटीने फायदा होईल तसेच शेतीसाठी येणारा खर्च हा देखील नियंत्रणात येईल,
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करण्यामागील काय आहे उद्दिष्ट ?
एकंदरीत या बॅटरी ट्रॅक्टर मुळे शेतकरी आधुनिक शेतीकडे जास्त प्रमाणात वळेल आणि भारतीय शेतीमध्ये सुधारणा होईल असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. या बॅटरी चलित इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करण्यासाठी तसेच आपला शेतमाल बाजारापर्यंत नेण्यासाठी कमी खर्च लागेल आणि याचा सरळ परिणाम हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दिसून येईल यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांची कमाई ही डबल होणार आहे. मात्र माननीय मंत्री महोदय यांनी यावेळी कोणती कंपनी हे बॅटरी चलित ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करणार आहे याची माहिती देण्यास नकार दर्शविला जरी असला तरी मंत्रीमहोदयांनी ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे लॉन्च करायला आता फक्त काही औपचारिकता बाकी आहे हे नमूद केले. जमिनीची मशागत करण्यासाठी बॅटरी चलीत ट्रॅक्टरला अधिक ऊर्जेची आवश्यकता पडेल, त्यामुळे बॅटरी चलित ट्रॅक्टर मशागतीसाठी वापरले जाऊ शकते की नाही यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. मात्र माननीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले होते की ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर द्वारे शेतमाल हा बाजारापर्यंत नेला जाऊ शकतो. मागच्या आठवड्यात माननीय मंत्री एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स इवी समिटमध्ये हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी संप मिटला असे संबोधन केले होते. एका शेतकऱ्याला बाजार समितीत शेतमाल घेऊन जाण्यासाठी एका ट्रीपला ऍव्हरेज 200 रुपयांचा खर्च लागतो, त्यामुळे येत्या काही दिवसात बाजारात एक दमदार ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करणार.असे मंत्री महोदयने संगितले आहे.
सोनालीका कसे व का करत आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च ?
भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतीने आभाळ गाठले आहे, राज्यात डिझेलची किंमत ही शंभरच्या ही पार झाली आहे, पेट्रोल तर ११० रुपये लिटरने विक्री होत आहे, त्यामुळे मागच्या काही महिन्यात शेतीसाठी लागणारा खर्च हा दुपटीने वाढला आहे. त्यामुळे ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक बनत चालले आहे. पंजाब राज्यात स्थित सोनालिका ट्रॅक्टर्स देशातील एकमेव अशी ट्रॅक्टर कंपनी आहे जिने व्यावसायिक दृष्ट्या बाजारात एक ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉंच केले आहे. सोनालिका च्या ट्रॅक्टर ला टायगर इलेक्ट्रिक म्हणून संबोधले जाते सोनालिका कंपनीने या ट्रॅक्टरला २०२० मध्ये लॉन्च केले होते. आता सोनलिकाच्या वाटेवर महेंद्रा देखील चालणार आहे असा अंदाज दिला जात आहे.