दुप्पट कमाई साठी सुवर्ण संधी, फिश राईस फार्मिंग!
भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दुप्पट पैसे मिळवण्याची सुवर्ण संधी म्हणजे फिश राईस फार्मिंग होय. यामध्ये भाताची लागवड ही एका विशिष्ट पद्धतीने करावी लागते. भात लागवडीबरोबर मासेपालन देखील करण्यात येते. धान बरोबर मासे विक्री करून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. आपण आज फिश राईस फार्मिंग बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
फिश राईस फार्मिंग साठी योग्य जमीन –
१. यासाठी उतार असणारी जमीन असणे गरजेचे आहे. जेणेकरून पाणी सहजपणे जमा होईल.
२. या शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा.
३. या शेतीसाठी गाळाची माती उत्तम ठरते.
फिश राईस फार्मिंग –
१. भात पीक घेतल्या जाणाऱ्या शेतातील साठलेल्या पाण्यामध्ये मासेपालन केले जाते.
२. शेतकरी भात लागवडी बरोबर फिश कल्चर तयार करू शकतात.
३. शेती बरोबर मासेपालन म्हणजेच मत्सशेतीतुन शेतकरी अधिक उत्पन्न मिळवू शकतो.
४. भात लागवड पद्धत , माशांची प्रजाती या गोष्टींची काळजी बारकाईने घ्यावी लागते.
५. माश्यांचा भात उत्पादनावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही.
६. मासेपालन केल्यामुळे भात पिकाचे रोगांपासून संरक्षण होते.
७. फिश राईस फार्मिंग थायलंड, चीन, बांगलादेश, मलेशिया, कोरिया आदी देशांमध्ये आवर्जून केली जाते.
भारतामधील काही भागांमध्ये फिश राईस फार्मिंग करून चांगले उत्पन्न मिळवल्या जाते. त्यामुळे फिश राईस फार्मिंग ही एक दुप्पट पैसे कमवण्यासाठीची सुवर्ण संधी आहे असे म्हणता येईल.