इतर बातम्या

तोडणीला आलेला ६५ एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

Shares

मागील काही दिवसापासून शेताला आग लागण्याच्या कित्तेक घटना समोर आल्या आहेत. अश्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात न भरून निघणारे नुकसान झाले आहे. आता भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे तब्बल ६५ एकरातील ऊस (Sugarcane Farm) जळून खाक झाला आहे. ही घटना शॉर्टसर्किट मुळे घडल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या मराठवाड्यात ऊस गळतीचा हंगाम सुरु असून सर्वात महत्वाच्या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड मराठवाड्यामध्ये झाली आहे. ऊसाच्या पिकावर नैसर्गिक संकटांचा परिणाम झाला मात्र मागील १५ दिवसांपासून ऊसाच्या शेतीस आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. ८ दिवसापूर्वी लातूर शहराजवळील भिसे वाघोली येथे ५० एकरातील ऊस जळून मोठे नुकसान झाले होते. आता तर तब्बल ६५ एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किट (Short Circuit) मुळे ही घटना घडल्याचे समोर आले असून ऊसाची अगदी काहीच दिवसांमध्ये तोडणी होणार होती. या शॉर्टसर्किटमुळे ३९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.


हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

आर्थिक मदतीसाठी काय करावेत?
जर ऊस जळण्यामागे महावितरण कारणीभूत असेल तर शेतकऱ्यांना महावितरणच्या विभागीय कार्यालयात अर्जासोबत संबंधित कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. या कागदपत्रांमध्ये मागील ३ वर्षाचा सातबारा (७/१२) उतारा, महसूल विभाग आणि पोलिसांनी केलेला पंचनामा, किती क्षेत्रावरील ऊसाचे नुकसान झाले आहे त्याचे फोटो, या बरोबर इतर साहित्य जळाले असतील तर त्यांची बिले तसेच साखर कारखान्यांची मागील ३ वर्षातील बिले यांचा समावेश आहे. त्याचबरोबर किती नुकसान झाले आहे याचा कृषी विभागाने दिलेला अहवाल देखील आवश्यक आहे.

हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय

आग जास्त पसरण्याचे कारण काय?
अगदी काहीच दिवसांमध्ये तोडणी होणार होती.त्यामुळे ऊस अंतिम टप्यात होता तर ऊसाचे पाचरट हे वाळलेले होते त्यामुळे आग पसरण्यास जास्त वेळ नाही लागला. शेतकऱ्यांनी ही आग वीजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ही आग वारा , वाळलेले ऊसाचे पाचरट यामुळे आग ही पसरतच गेली असून सकाळी लागलेली आग ही दुपारी साधारणतः ३ च्या सुमारास विजली. तोपर्यंत मात्र ऊसाबरोबर इतर साहित्यांची राखरांगोळी झाली होती.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठीच्या १४ अंकाचा युनिक लँड आयडीची चाकण पासून सुरुवात

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *