बनावट बुरशीनाशकाने शेतकऱ्याचे लाखोंचे केले नुकसान
भारताची ५० ते ६० टक्के अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी विविध प्रकारची पिके घेत असतो. उत्पादनात वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी अनेक प्रयोग करत असतो. तसेच जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कमी होऊ न देता जास्तीत जास्त उत्पादन वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी पिकांना खते देणे काही वेळा गरजेचे असते. पेरणी झाल्यानंतर पिकांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी शेतकरी पिकांना खते देत असतात.जेव्हा खतांचा तुटवडा होतो तेव्हा बाजारात अनेक दुकानदार बनावट खतांची विक्री करण्यास सुरुवात होते. यामुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसानीसह पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होते.बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात परिणाम फळपिकांवर झाला आहे. जवळजवळ सर्वच पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आला त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाच्या संरक्षणासाठी रासायनिक खतांचा वापर केला होता. परंतु रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर पिकांची स्थिती सुधारण्यापेक्षा पिकांची नासाडी होतांना आढळून आली. त्याचे कारण म्हणजे बनावटी बुरशीनाशके होय.
बनावट बुरशीनाशकामुळे झाले लाखोंचे नुकसान
नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या डाळींब बागायतीमध्ये डाळिंबाचे उत्तम पीक यावे यासाठी बुरशीनाशकाची फवारणी केली होती. बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर पिकात सुधारणा होण्याऐवजी तब्बल २५ लाखांचा चुना या शेतकऱ्यास लागला. या शेतकऱ्याने ज्या कंपनीच्या बुरशीनाशकाचा अवलंब केला होता. ती कंपनी अस्तित्वातच नाही असे निदर्शनात आले. या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होण्यापासून थांबवू शकत नाही. याव्यतिरिक्त कीटकनाशकांवर केलेला खर्च देखील वाया गेला.
बनावटी कीटकनाशके कशी ओळखावेत ?
कधीही कीटकनाशकांची खरेदी करतांना त्यावरील एक्सपायरी डेट तपासून घ्यावेत. कृषी अधिकारी तसेच अनुभवी शेतकऱ्याचा सल्ला घ्यावा. कीटकनाशकाची खरीदी करतांना कोणती कंपनी आहे. त्या नावाची कंपनी आहे कि नाही य सर्व बाबींची तपासणी करणे गरजेचे आहे. कोणतेही कीटकनाशके बाजार येण्यापूर्वी त्यांची चाचणी होणे गरजेचे आहे असा नियमच आहे. मात्र अनेक जण जास्त तसेच लवकर पैसे मिळावेत यासाठी बनावटी खते, कीटकनाशकांची विक्री करतात. याच परिणाम शेतीवर तसेच जमिनीवर जास्त प्रमाणात होतो. जमिनीचे देखील मोठे नुकसान होते.
खते , कीटकनाशके खरेदी करतांना काळजी घेणे गरजेचे आहे.