द्राक्षावरील महत्वाच्या किडी व रोग आणि त्यावरील नियंत्रण
द्राक्षाच्या किडी व रोग यांचे आपण दोन प्रकारामध्ये विभाजन करू शकतो. एक म्हणजे जैविक किंवा सूक्ष्मजंतु आणि दुसरे म्हणजे अजैविक किंवा सूक्ष्मजंतु शिवाय असे . आपण आज या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात .
जैविक किंवा सूक्ष्मजंतु-
द्राक्ष पिकाचे जैविक किंवा सूक्ष्मजंतु यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामध्ये बुरशी , जिवाणू, विषाणू यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या रोगांचे वेळीच लक्षणे ओळखून निवारण करणे गरजेचे असते .अन्यथा ते लवकर पसरते. परंतु त्यांच्या निवारणासाठी रोगांची माहिती , बुरशीचा जीवनक्रम माहिती असणे गरजेचे असते.
केवडा –
१. केवडा रोगाची लागण ही प्लझमोपॅरा व्हीटीकोला या बुरशीमुळे होते .
२. पावसाळ्यात ही बुरशी मोठ्याप्रमाणात पसरते .
३. या बुरशीचे धागे नळीच्या आकाराचे असते .
प्रसार कसा होतो –
१. आद्रतायुक्त हवामानात या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
२. ज्या जमिनीचे भौतिक गुणधर्म हरवले असते त्या जमिनीमध्ये देखील याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते .
३. या रोगासाठी दमट वातावरण पुरेशे असते .
४. याचा प्रभाव द्राक्षाच्या फुलांवर , पानांनावर होतो .
५. या रोगास पोषक असे हवामान असेल तर याचे निवारण करणे खूप कठीण होते .
६. हा रोग द्राक्षांमध्ये हमखास होणार रोग आहे .
रोगांची लक्षणे –
१. या रोगांची लक्षणे जवळजवळ वेलीच्या सर्व हिरव्या भागांवर आढळतात .
२. हिरव्या पानांवर सुरवातीला लहान तेलकट डाग पडण्यास सुरुवात होते .
३. दमट हवामानात हा भाग रोगग्रस्त होऊन वेलीवर पडतो.
४. ह्या रोगाला पानांपासून फुले आणि द्राक्षापर्यंत पोचण्यास वेळ लागत नाही .
५. या रोगामुळे द्राक्षे जळून खाली पडतात.
६. अनेकदा द्राक्ष मणी अर्धवट वाढतात .
बुरशीचे जीवनक्रम –
१. या बुरशीचे कवक तंतू सलग पटलरहित असतात .
२. ही बुरशी प्लझमोपॅरा व्हीटीकोला शेवाळ कवक वर्गातील आहे.
३. या बीजुक दंडाची संख्या निश्चित नसून ती २० पर्यंत असते .
४. या रोगाचा प्रसार रोगट पानात तयार होणाऱ्या लैंगिक बिजाद्वारे , वेलीवर राहिलेल्या हिरव्या रोगग्रस्त पानांमुळे असलेल्या बुरशीच्या तंतूमुळे होतो .
५. विबीजुक तयार होण्यास १२ अंश सेल्सि पर्यंत तापमाप पोषक असते .
६. या रोगाच्या झपाटाने वाढीकरिता जमिनीतील , हवेतील , वेलीतील पाण्याचे प्रमाणात आवश्यक असते .
७. जमीन निकुष्ट दर्जाची असल्यास या रोगाचे नियंत्रण करणे अवघड जाते .
रोगाचे नियंत्रण –
१. द्राक्ष लागवडीपूर्वी जमीन सुपीक आणि योग्य निचऱ्याची असणे गरजेचे आहे .
२. रोगग्रस्त भागाची पाहणी करून नष्ट करणे .
३. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फोसेटिल एएल फेनीन अमाईड, थायो लीनेट मिथेल किंवा रीडोमील ०.२५६ % तीव्रतेची केवोलीन औषधासोबत फवारणी करावी.
४. या रोगामुळे श्वसनक्रियेत बदल होऊन वाढती विकृती आढळते .
५. यावर शलाका कॅप्सूल ची फवारणी करावी .
करपा –
१. एल्सिनॉई अॅमेसेलीना व स्पोसिलोमा अॅम्पेलिनम या बुरशीमुळे द्राक्ष पिकात करपाची लागावं होते.
२. युरोपिअन देशातून या रोगाचा प्रसार झाला.
३. या रोगाचे प्रमाण कमी झाले होते परंतु सेंद्रिय बुरशीनाशकांमुळे पुन्हा या रोगाचे प्रमाणात वाढले .
४. या रोगाचा प्रसार वारा , पाऊस या माध्यमातून मोठया प्रमाणात होतो .
रोगाची लक्षणे –
१. या रोगामध्ये द्राक्षाच्या पानांवर बारीक ठिपके पडतात .
२. या ठिपक्यांचा आकार गोल किंवा कोनात्मक असून त्याचा रंग तपकिरी असतो .
३. या ठिपक्यांची वाढ होऊन हे ठिपके एकमेकांमध्ये मिसळून पानांवर छिद्रे पडतात.
४. नवीन फुटींवर जास्तप्रमाणत प्रादुर्भाव झाल्यास शेंडयाचा भाग करपतो.
५. फुलोरा असतांना प्रादुर्भाव झाल्यास फुलोरा करपतो .
बुरशीचे जीवनक्रम –
१. जुन्याभागातील बीजुक अनुकूल परिस्तिथीत २४ तासातच अलैकिक बीजुक तयार होते .
२. ३२ अंश सेल्सि तापमान असल्यास ३-४ दिवसातच ही बुरशी पसरते .
३. पाऊस , वारा यामुळे निरोगी भागात हा रोग पसरतो .
रोगाचे नियंत्रण –
१. निकृष्ट निचऱ्याची जमीन द्राक्ष लागवडीसाठी निवडू नये .
२. सुरवातीला खते देतांना सेंद्रिय खतांचा वापर करावा .
३. बाग करपा मुक्त ठेवण्यासाठी बुरशी संरक्षण म्हणून ०.२% किंवा ०.४ तीव्रतेची बोर्डोमिश्रणाची फवारणी २० ते २५ दिवसाच्या अंतरांनी करावी.
४. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रचक कॅप्सूल आणि केवोलिन औषधाची फवारणी करावीत .
भुरी –
१. या बुरशीचा प्रादुर्भाव अनसिन्युला निकेटर या बुरशीमुळे होतो .
२. या रोगाचा सर्वप्रथम प्रादुर्भाव अमेरिकेत आढळुन आला होता .
३. आता भारतात हा महत्वाचा रोग झाला आहे. या रोगाने फ्रान्सचे देखील मोठ्या संख्येने नुकसान केले होते .
४. भारतात या रोगाची लक्षणे शक्यतो ऑक्टोम्बर महिन्यात दिसून येतात .
५. प्रतिकूल वातावर भेटले की याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आणि लवकर वाढतो .
रोगाची लक्षणे –
१. याचा प्रादुर्भाव वेलींच्या हिरव्या भागावर जास्त होतो.
२. या बुरशीचे धागे सर्वप्रथम वेलींच्या पृष्ठ भागावर प्रवेश करते .
३. या रोगामुळे पानांवर पिवळसर आणि पांढरट रंगाचे ठिपके दिसू लागतात .
४. कालांतराने हे ठिपके भुरकट आणि काळ्या रंगाचे दिसू लागते .
५. फुलोरा असल्यास त्यास या रोगाची लागवण झाल्यास फळधारणा होत नाही .
रोगाचे नियंत्रण –
१.जर कमी प्रमाणात प्रादुर्भाव झाला असेल तर बेनोमील (बेनलेट) बेलेटॉन (ट्रायडीफॉन)०.२५ तीव्र द्रावणाचा वापर करावा.
२. जर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्यास अॅझाक्सीस्टोपीन २३ ईसी (अॅमिस्टार) २०० मिली एकर असा वापर करावा .
३. या रोगाची लागण रायझोक्क्तोनिया बटाटीकोला या बुरशीमुळे होते .
४. द्राक्ष बागेत हवा खेळती राहावी आणि सूर्यप्रकाश सहज पोहचावा अशी व्यवस्था केली पाहिजे .
द्राक्ष लागवड करतांना जर जमिनीच्या सुपीकतेकढे लक्ष दिले तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आणि वेळीच लक्षणे ओळखली तर रोग पसरण्यापूर्वी त्याचे निवारण करता येते .