पीककर्जाचे दर निश्चित, मुख्य पिकांना अधिक रक्कम मिळणार!
शेतकऱ्यांना हंगामी पीक घेतांना पीककर्जाचा मोठा आधार होतो. त्यामुळे रब्बी तसेच खरीप हंगामात राष्ट्रीयकृत बॅंकांना पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट हे दरवर्षा ठरवून दिले जाते. यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीनसाठी हेक्टरी 53 हजार 900 तर उसासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारने बॅंकांना दिले आहेत. तर ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.
हे ही वाचा (Read This) कृषी सुवर्ण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी दरात कर्ज मिळेल, ट्रॅक्टरवर देखील मिळणार कर्ज
या पीककर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीचा चर्च भागणार आहे. तसेच शेतकऱ्यांना परतफेड करण्यासाठी १२ महिन्यांची सूट दिली जाणार आहे.
मुख्य पिकांना मिळणार अधिकची रक्कम
शेतकरी सध्या शेतीची मशागत करत आहेत. तर याच काळामध्ये शेतकऱ्यांना पीककर्जाची अधिक गरज असते. शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्याची प्रक्रिया अवघड वाटत असली तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी हा या मागचा उद्धेश आहे. यंदा मुख्य पिकांना अधिक कर्ज मिळणार असून हेक्टरी सोयाबीनसाठी 53 हजार 900 रुपये ठरवून देण्यात आले आहेत तर उसासारख्या नगदी पिकासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे.
हे ही वाचा (Read This) सरकारी नौकरी 2022: बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज
आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- 8 अ
- शेतीचा नकाशा
- फेरफार
- मुल्यांकन म्हणजेच व्हॅल्युनेशन
- आधार कार्ड झेरॉक्स
- 3 फोटो
हे ही वाचा (Read This) शेकडो आजारांना पळवून लावणारे कडुलिंब
३१ जुनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार
शेतकऱ्यांना खरिपातील पेरणी पूर्ण होण्यापूर्वी हे कर्ज मिळाले तर त्यांना जास्त लाभ होईल. त्यामुळे आतापासूनच प्रक्रिया सुरु झाली तर शेतकऱयांना लाभ होईल. जिल्हा प्रशासनाच्या बैठका पार पडत असून जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारी बैठकीत उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या सूचना बॅंक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हे ही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा