कापसाच्या दरात तेजी कायम? काय आहे आजचे भाव?
कापसाचे दर सुरुवातीपासूनच चांगले होते तर मध्यंतरी अगदी कमी प्रमाणात या दरामध्ये चढ उतार होत होती. यंदा अवकाळी, अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळेच कापसाच्या दरात वाढ होत आहे असे व्यापारांचे म्हणणे आहे.
कापसाचे दर लवकरच १२ हजारांचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. तर एकीकडे कापसाची मागणी देखील वाढत आहे.
कापसाचे आजचे दर काय आहे ?
बाजारपेठेतील कापसाच्या रुईचे प्रमाण जास्त तर सरकीची जाडी कमी असल्यामुळे बाजारपेठेतून कापसाला अधिक जास्त प्रमाणात मागणी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील याची मागणी वाढतांना निदर्शनात येत असून बांग्लादेश तसेच चीनमध्ये याची निर्यात अधिक प्रमाणात होत आहे.