इतर बातम्याबाजार भाव

कापसाच्या दराचा चढता क्रम, अंतिम टप्यात असूनही विक्रमी दर

Shares

कोणत्याही पिकाचे दर हे संपूर्ण हंगाम टिकून राहत नाही. मात्र यंदा यामध्ये कापूस अपवाद ठरला आहे. कापसाचे दर हे हंगामाच्या सुरुवातीपासूनच टिकून राहिले आहेत. तर त्यामध्ये वाढ होत गेली आणि कापसाला विक्रमी दर मिळाला आहे.
आता कापूस अंतिम टप्यात असल्यामुळे आवक कमी झाली आहे. मात्र दरात वाढ होताना दिसून येत आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला १२ हजार ५०० असा दर मिळत आहे. तर त्याची आवक १०० क्विंटलच्या आसपास होत आहे.

हे ही वाचा (Read This) काळ्या हळदीची लागवड करून मिळवा ‘पिवळ्या’ हळदीपेक्षा १० पट भाव

कापसाचे आजचे दर

आवक घटून देखील दराचा चढता क्रम

मागील ६ महिन्यापासून कापसाची आवक सुरु असून एकदाही कापसाच्या दरामध्ये घसरण झालेली नाही. तर दरामध्ये वाढ होतानाच दिसून आली. हंगामाच्या सुरुवातीला कपासाला प्रति क्विंटल ६ हजार ४०० असा दर मिळत होता. मात्र आता प्रति क्विंटल १२ हजार रुपये असा दर मिळत आहे.
त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हा आनंदात दिसत आहे.

हे ही वाचा (Read This) काळ्या हळदीची लागवड करून मिळवा ‘पिवळ्या’ हळदीपेक्षा १० पट भाव

मराठवाड्यात पुन्हा कापसाचे क्षेत्र वाढणार का ?

मागील काही वर्षात मराठवाड्यात कापसाच्या क्षेत्रात घट झालेली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव अणि घटत्या दरामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला होता. परंतु यंदाचे दर पाहून पुन्हा कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमधून तर कापूस पीक हे हद्दपारच झाले आहे. त्यामुळे पुन्हा पांढरे सोने बहरणार का हे पहावे लागणार आहे.

हे ही वाचा (Read This) गुलखैरा शेती : या औषधी वनस्पतीचा लागवड करून कमी दिवसात दुप्पट नफा मिळवा

शेतकऱ्यांच्या निर्णयामुळे दरात वाढ

अतिवृष्टी , अवकाळीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. उत्पादनात घट झाल्याने यंदा कापसाच्या दरात वाढ होणार हे निश्चित होते. त्यामुळेच हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस विक्री करायची नाही असा निर्णय घेतला होता. व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन देखील शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीलाच महत्व दिले.

हे ही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

Shares