बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण अर्थकारणाला गती
बैलगाडा शर्यतीवरून बंदी उठवल्यानंतर पासून बैलगाडा मालक अगदी उत्स्फुर्तपणे शर्यतीमध्ये भाग घेत असून कित्तेक दिवसानंतर गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंपरेनुसार जिल्ह्यातील बहुतेक ग्रामदैवतच्या यात्रानिमित्ताने बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जात आहे.
हे ही वाचा (Read This ) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग
बहुतेक ठिकाणी तर यात्रा तसेच जत्रा चे हंगाम सुरु झाले आहे.त्यामुळे बैलगाडा मालक तसेच अनेक विक्रेत्यांचे चांगले दिवस आले आहे असे म्हणता येईल.
कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले होते त्याचा अजून ही आर्थिक परिणाम विक्रेत्यांवर होत होता. तर आता वडापाव व भेळ विक्रेते, लहान मुलांच्या खेळण्यांचे दुकाने, कलाकुसरीच्या तसेच मातीच्या वस्तू विकणारे, शेव व रेवडी आदी विक्रेत्यांना आता फायदा होत आहे.
हे ही वाचा (Read This ) सोयाबीनच्या दराचा आलेख उंचावला, पुन्हा १० हजारचा पल्ला गाठणार?
बैलांच्या किंमतीत वाढ…
शर्यतीसाठी लागणाऱ्या खिल्लारी जातींच्या बैलांच्या किंमतीत वाढ झाली आहे. शेतकरी तब्बल ४० हजार ते २५ लाख रुपयांनी बैलांची खरेदी करत आहेत. शर्यती मुळे बैल खरेदी व विक्रीचे व्यवहार वाढले आहेत गावातील घाटांमध्ये बैलाला प्रशिक्षण देऊन त्याला चांगला खुराक देऊन बैलाला कमीत कमी वेळात कसा घाट पार केला जाईल याची काळजी घेतली जात आहे.
हे ही वाचा (Read This ) मोत्यांची शेती करून मिळवा लाखों रुपये, संपूर्ण माहिती