इतर बातम्यापशुधन

म्हैस पालनासाठी मिळणार लाखोंचे अनुदान

Shares

शेतकरी अधिक उत्पन्नासाठी शेती बरोबर पशुपालन देखील करत असतो. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना , कार्यक्रम राबवत असतो. त्यात पशुपालनासाठी अनेक योजना राबवल्या जातात. बहुधा शेतकरी शेतीबरोबर डेअरी व्यवसाय करत असतो . डेअरी व्यवसायातून शेतकरी अधिक नफा कमवू शकतो. हा व्यवसाय अगदी छोट्या स्तरापासून देखील सुरु करता येतो. अगदीच २ ते ३ गाई किंवा म्हैस खरेदी करून देखील हा व्यवसाय करता येतो. डेअरी व्यवसायासाठी सरकारकडून अनुदान देखील दिले जाते. पशुपालनासाठी सरकारने कोणत्या योजना राबवल्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

डेअरी व्यवसायासाठी सरकारची योजना
शेतकऱ्यांना डेअरी व्यवसायामध्ये मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने दुग्ध उद्योजकता विकास योजना राबवली आहे. आधुनिक दुग्ध शाळेची निर्मिती करणे असा या योजनेचा मुख्य उद्धेश आहे . या योजनेचा लाभ शेतकऱ्यांबरोबर पशुधन मालक देखील घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत तुम्हाला बँकेकडून कर्ज देखील मिळवता येत असून सबसिडी देखील उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत नाबार्ड तर्फे देखील कर्ज दिले जाते.

तुम्हाला १० गाय किंवा म्हैस डेअरी उघडायची असेल तर साधारणतः १० लाख रुपये पर्यंतची आवश्यकता असते. तुम्हाला कृषी मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जात असून हे अनुदान नाबार्ड कडून देण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या किमतीच्या २५ टक्के अनुदान सबसिडी म्हणून दिले जाते. जर तुम्ही आरक्षित असाल तर ३३ टक्यांपर्यंत सबसिडी मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी १० जनावरांची दुग्ध शाळा असणे आवश्यक आहे.

दोन जनावरांवर अनुदान हवे असल्यास ..?
तुम्ही जर सुरवातीस कमी जनावरांमध्ये व्यवसाय सुरु करणार असाल तर तुम्ही २ गाय म्हशींमध्ये डेअरी सुरु करू शकता. तुम्हाला यासाठी ३५ ते ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळवता येते.

अर्ज कुठे करावा ?
जवळजवळ सर्व जिल्ह्यात नाबार्डचे कार्यालय आहे. तुम्ही त्या कार्यालयात जाऊन तुमचा डेअरी प्रकल्प मांडू शकता. तुमच्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग यामध्ये तुम्हाला साहाय्य करेल. याचबरोबर तुम्ही डायरेक्ट पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज करतांना खाली दिलेल्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
१. आधार कार्ड
२. कौटुंबिक ओळखपत्र
३. पॅन कार्ड
४. बँक पासबुक झेरॉक्स

भारतामधील अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या म्हशीच्या जाती
मुरा, नागपुरी, जाफराबादी, पंढरपुरी, निलीरावी, बन्नी , भदावरी , चिल्का, तोडा, मेहसाणा, सुरती आदी सुधारित जातीपासून अधिक उत्पन्न मिळवता येते.

हे ही वाचा

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *