ब्राम्हीची शेती करून मिळवा तीनपट अधिक नफा
शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतो. पारंपरिक पिकांव्यतिरिक्त इतर पिकांची लागवड तो करत आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येण्यासाठी सरकार देखील विविध योजना राबवून मदत करत आहे. त्यामुळे औषधी वनस्पती लागवडीकडे शेतकरी जास्त वळत आहे. अशीच एक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी ब्राम्ही वनस्पतीची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. या वनस्पतीच्या लागवडीसाठी खर्च अगदी कमी लागतो तर या पासून नफा भरपूर होतो. या वनस्पतीची लागवड भारताबरोबर अमेरिका , युरोप मध्ये देखील केली जाते. ही वनस्पती जमिनीवर फैलाव करत वाढते. या वनस्पतीस पांढरी फुले येतात. या वनस्पतीच्या काही प्रजातींना गुलाबी , निळी फुले येतात.शक्यतो ओलसर ठिकाणी ही वनस्पती आढळते. या वनस्पतींचे काही फायदे आपण जाऊन घेऊयात.
ब्राम्ही वनस्पतीचे फायदे –
१. ब्राम्ही वनस्पतीची पाने बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.
२. या वनस्पतीचा रस संधिवातावर उपयुक्त ठरतो.
३. या वनस्पतीचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
४. ही वनस्पती स्मरणशक्ती वाढण्यास मदत करते.
५. कर्करोग , अशक्तपणा, दमा, मिर्गी ,मूत्रपिंड यांसारख्या रॊगावरील औषध बनवण्यासाठी ब्राम्ही वनस्पतीचा उपयोग होतो.
६. साप चावल्यास या वनस्पतीचा वापर करतात.
ब्राम्ही वनस्पतीची शेती –
१. ब्राम्ही वनस्पती तलाव , नदी , कालवे अश्या जलीय प्रदेशात जंगली स्वरूपात वाढते.
२. भारतात सर्व राज्यांमध्ये या वनस्पतीची लागवड केली जाते.
३. या वनस्पतीच्या लागवडीसाठी खर्च कमी लागतो तर नफा जास्त होतो.
४. दलदलीच्या प्रदेशात या वनस्पतीची लागवड उत्तम करता येते.
५. या पिकाच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ५ ते ७ दरम्यान असावा लागतो.
६. या पिकाची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून काही दिवस ठेवावी.
७. त्यांनतर जमिनीत सेंद्रिय खत मिसळावेत.
८. ब्राम्ही पिकाची रोपे लावण्याची सर्वात उत्तम हंगाम म्हणजे पावसाळा.
९. लागवडीनुसार शेतात बांध तयार करून घ्यावेत.
१०. ब्राम्ही पिकाच्या उत्तम वाढीसाठी तणनियंत्रण करणे गरजेचे आहे.
कापणी व उत्पादन –
१. ब्राम्ही वनस्पतीस खोडापासून वर ४ ते ५ सेंटीमीटर वर कापले जाते.
२. उर्वरित भाग पुन्हा वाढ व्हावी यासाठी ठेवला जातो.
३. या पिकाची कापणी केल्यांनतर सावलीमध्ये यापिकास वाळवले जाते.
४. प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते.
५. तीन ते चार वेळा ब्राम्हीचे पीक घेता येते.
६. या पिकाच्या गुंतवणुकीपेक्षा ३ ते ४ पट जास्त उत्पन्न मिळते.
ब्राम्ही वनस्पतीची औषधी बनवण्यासाठी मोठ्या संख्येने मागणी केली जाते. औषधी वनस्पतीचे पीक घेत असाल तर ब्राम्ही वनस्पतीची लागवड करण्यास काही हरकत नाही.