सिंदूर (बिक्सा ओरेलाना) लागवड पद्धत
भारतामध्ये विविध कारणांसाठी सिंदूर वापरले जाते. सिंदूर हे एक लाल रंगाचे द्रव्य आहे. बिक्सा ओरेलाना या जातीच्या झुडुपापासून सिंदूर तयार केले जाते. सध्या याचा वापर रंग द्रव्ये म्हणून जास्त प्रमाणात होत आहे.त्यामुळे बाजारात याला मोठ्या संख्येने मागणी आहे. अन्नारटो या पिकाची पिकलेली फळे वाळवून त्यातील बिया काढून त्यापासून सिंदूर बनवले जाते.आपण जाणून घेऊयात अन्नारटो बद्दल संपूर्ण माहिती.
उपयोग –
१. लिंबूवर्गीय फळांचे रस रंगीत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
२. रासायनिक शाई , केशतेल , पॉलिश यासाठी या पिकाचा वापर होतो.
३. कपडे रंगविण्यासाठी, सौंदर्यप्रसादनात देखील याचा उपयोग केला जातो.
जमीन व हवामान –
१. अन्नारटो चे झाड काटक असल्यामुळे त्यास चांगल्या कसाच्या जमिनीची गरज नसते.
२. पाणी धरून ठेवणारी कोणतीही जमीन या पिकास मानवते.
३. दगडगोटे मिश्रित जमीन टाळावी.
४. अन्नारटो ही उष्ण कटिबंध वनस्पती आहे.
५. उष्ण , कोरड्या हवामानात हे पीक घेता येते.
६. धुके व हिम पडत असलेल्या प्रदेशात हे पीक घेणे टाळावेत.
लागवड –
१. एप्रिल – मे हा रोपवाटिका तयार करण्यासाठी उत्तम कालावधी आहे.
२. अन्नारटो ची वृद्धी बिया तसेच खोडाद्वारे ही करता येते.
३. पॉलीथीन पिशव्यांमध्ये माती , वाळू , खत यांचे मिश्रण भरून अन्नारटो च्या रोपांची वाढ करतात.
४. एका पिशवीमध्ये एकच रोप लावले पाहिजे.
पाणी व्यवस्थापन –
१. या पिकांच्या लागवडीनंतर लगेच पाणी देतात.
२. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी हवामानाचा अंदाज घेऊन पाणी देणे महत्वाचे आहे.
काढणी –
१. लागवडी नंतर पहिल्या ते दुसऱ्या वर्षांपासून फुले येण्यास सुरुवात होते. अधिक फुलांच्या वाढीसाठी पहिल्या वेळेस फुले खुडून टाकतात.
२. लागवडीनंतर व्यवस्थापन चांगले केल्यास ८ ते १० वर्षापर्यंत चांगले उत्पादन मिळते.
३. तीस दिवसांच्या बहरानंतर झाडावर शेंगा येतात त्यानंतर ९० दिवसांनी शेंगा पिकून कालांतराने वाळतात.
४. या वाळलेल्या शेंगा काही दिवस पोत्यात भरून ठेवाव्यात. त्यानंतर उन्हात त्या वाळवाव्यात.
५. त्यातील बिया वेगळ्या करून उन्हात वाळवून पोत्यात भरून विक्रीसाठी पाठवाव्यात.
उत्पादन –
साधारणतः ४ वर्षाच्या झाडापासून दरवर्षी हेक्टरी २५० ते ५०० किलो बियाणे मिळतात.
बाजारात या बियाणांची मागणी मोठ्या संख्येने आहे. अन्नारटोचे चांगले व्यवस्थापन केल्यास त्यापासून उत्तम उत्पादन होऊन चांगले उत्पन्न मिळते.