या राज्यातील शेतकऱ्यांना ‘२४ तास वीज मोफत’
शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज या राज्याच नवीन वर्षाच मोठं गिफ्ट …
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२२ या वर्षाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांना एक मोठ गिफ्ट’ दिलंय. शेतीसाठी २४ तास मोफत वीजपुरवठा करणार आहे. अशी माहिती सरकारने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार राज्य ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी झाल्याचे म्हंटले असून विजेसंदर्भातील शेतकऱ्यांची निराशा दूर केल्याचे पत्रकामध्ये सांगितले.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पत्रात नमूद केलं कि कृषी सह सर्व क्षेत्रात २४ तास वीज पुरवठा केला जाणार आहे. सध्या सौर ऊर्जा निर्मितीत तेलंगणा राज्य देशात अग्रेसर ठरले आहे.
हे ही वाचा (Read This) सौर कृषिपंपासाठी नवीन अर्ज घेण्यास सुरुवात.
यासाठी सरकारची भूमिका ?
१. सुरळीपणे वीज पुरवठा करण्यासाठी विविध कामांना १२,६१० कोटी
२. १७२४ नवीन ट्रान्सफॉर्मर तसेच ५१४ नवीन सबस्टेशन स्थापन
३. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ११ हजार मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार
४. १,१५४ किलोमीटर लांब पॉवर लाईन टाकण्यात आलेली आहे.