बटाटा पिकावर होणाऱ्या रोग आणि किडीवर असे करा नियंत्रण
संपूर्ण भारतामध्ये बटाटा लागवडीखाली २१ लाख हेक्टर क्षेत्र आहे . महाराष्ट्रात ११.०९ लाख हेक्टर क्षेत्र बटाटा लागवडी खाली आहे. भाजीपालच्या वार्षिक उत्पादनात बटाटे पीक वर्षभर घेतले जाते. या पिकाचे मुळस्थान दक्षिण अमेरिका आहे. भारतामध्ये बिहार ,पंजाब , आसाम , उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात बटाटयाची लागवड मोठ्या संख्येने होते. महाराष्ट्रात सातारा , पुणे , अहमदनगर , नाशिक आणि औरंगाबाद येथे खरीप आणि रब्बी हंगामात याचे पीक घेतले जाते. बटाट्याचे अनेक फायदे आहेत . या मध्ये क आणि ब जीवनसत्वे असतात. यापिकांवर किडी आणि रोग यांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात होतो. त्यात मुख्य आणि जास्त प्रमाणात होणाऱ्या किडी म्हणजे मावा , फुलकिडे , कोळी , तुडतुडे , पाकोळी आणि हुमणी.
बटाटा पिकावरील कीड आणि रोगांचे एकत्रित व्यवस्थापन –
१. बटाटा लागवड ही योग्य अंतरावर करावीत.
२. दोन ते तीन दिवसातून एकदा पिकांची पाहणी करावी.
३. पाने जर पिवळी पडली असेल किंवा त्यांना जाळी धरली असेल तर ते नष्ट करावेत कारण अश्या पानांवर अळीपुंज असते.
४. पिकांमध्ये तसेच कडेने सापळा पिके लावावीत.
५. बटाटे लागवडीपूर्वी कीड विरहित व निरोगी बियाणे निवडावेत.
६. रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी लागवडी पूर्वी इमिडाक्लोप्रिड ४ मि . लि . प्रति लीटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावीत.
७. सुरवातीपासूनच रोग प्रतिकार जातींची लागवड करावीत .
८. शेतात चिकट पिवळ्या व निळ्या रंगाच्या सापळ्यांचा वापर करावा.
९. कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
१०. रस शोषणाऱ्या किडींसाठी कोवळ्या पानांवर आणि शेंड्यांवर कीटकनाशकाची फवारणी करावीत.
११. पाने खाणाऱ्या अळ्या आढळ्यास शेतात रात्रभर गवताचे लहान लहान ढीग ठेवावे आणि सकाळी अळ्यांसह त्यांना जाळून टाकावेत.
१२. जास्त संख्येने पाने खाणाऱ्या अळ्या असतील तर न्यूमोरिया रिलाय ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून त्यांची फवारणी करावीत.
बटाटा हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देते. परंतु चांगल्या उत्पादनासाठी बटाटे पिकांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे.