भरघोस उत्पन्न देणारी पपई लागवड !
पपईच्या कच्च्या फळाची भाजी करतात. पपई च्या पानांची देखील भाजी बनवली जाते. पपई मध्ये कर्बोदके , जीवनसत्व अ , ब , क भरपूर प्रमाणात असतात. भारतात सुमारे ३२५०० हेक्टर क्षेत्र पपई लागवड खाली आहे. पपई चे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये औषधी गुणधर्म दडलेले आहेत. भूक मंदावणे , कावीळ, पचन संबंधित विकार झाल्यास पपई खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. संपूर्ण जगात पपईची मागणी आहे. तर आपण जाणून घेऊयात अश्या बहुगुणी पपईची लागवड पद्धत.
जमीन व हवामान –
१. मध्यम काळ्या जमिनीत , गाळाच्या जमिनीत पपई लागवड करता येते.
२. काळ्या भारी व खोलगट जमिन पपई लागवडीसाठी योग्य ठरत नाही.
३. मोकळी पाण्याचा निचरा करणारी जमीन निवडावीत जेणेकरून पीक चांगले येईल.
४. जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असणारी जमीन या पिकास उत्तम ठरते.
५. पपई पिकासाठी उष्ण , कोरडे हवामान मानवते.
६. योग्य पाणीपुरवठा असलेले ठिकाण या पिकासाठी निवडावेत.
७. थंड हवामानात या पिकाची लागवड केल्यास पपई बेचव होते.
लागवड –
१. मुख्यतः पपई लागवड जून- जुलै , सप्टेंबर- ऑक्टोबर , जानेवारी- फेब्रुवारी या तीन हंगामात करावी.
२. महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर महिन्यात लागवड केली जाते.
३. लागवड करण्यापूर्वी जमीन सपाट करून घ्यावी.
४. ४५ x ४५ x ४५ सेमी आकाराचे खड्डे खोदून काही दिवस त्यास ऊन खाऊ देणे.
५. त्यांनतर प्रत्येकी खड्यात शेणखत २० किलो , सुपर फॉस्फेट ५०० ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश २५० ग्रॅम, निंबोळी पेंड ५०० ग्रॅम मातीत मिसळून भरावे.
६. प्रत्येक खड्याभोवती पाणी देण्यासाठी आळे तयार करावे.
७. तीन ते चार दिवसांनी वापसा आल्यास रोपांची लागवड करावीत.
पाणी व्यवस्थापन –
१. या पिकास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
२. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास मुळे कुजतात, पिकास लवकर रोग्याचा प्रादुर्भाव होतो.
३. पपई बागेतील पाण्याचा निचरा उत्तम होईल याची काळजी घ्यावी.
४. पाणी आवश्यकतेनुसारच द्यावे अन्यथा पीक खराब होण्याची शक्यता असते.
काढणी –
१. लागवड केल्यानंतर पपईची फळे ९ ते १० महिन्यांनी पक्व होतात.
२. पपईच्या झाडास वर्षभर फळ धारणा होत असते. त्यामुळे एकाचवेळी काढणी करण्याची गरज नाही.
३. या फळांची तोडणी करतांना देठासोबत यांची तोडणी करावी.
४. फळांची वाढ पूर्ण झाल्यास त्यांची काढणी केल्यास फळास चव येते.
५. बाजारपेठ लांब असेल तर फिक्कट हिरवी, थोडी कडक फळे तोडावीत.
उत्पादन –
१. एका झाडापासून एका वर्षी ७० ते ८० फळे मिळतात.
२. या फळांचे वजन साधारणतः ५०० ग्रॅम ते ३ किलो पर्यंत असते.
३. दरवर्षीं सरासरी १२ ते १५ टन पर्यंत उत्पादन मिळते.
पपईची मागणी औषध तयार करण्यासाठी देखील केली जाते. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करून पपई लागवड केल्यास नक्कीच जास्त उत्पादन मिळून उत्तम नफा होईल.