बक्कळ पैसा मिळवा थाई अँपल बोर लागवड करून
कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर फळबाग शेती हा सर्वोत्तम पर्याय आहे. फळबाग लागवड बक्कळ पैसे मिळवून देते. त्यात जर तुम्ही अँपल बोर लागवड करत असाल तर थाई अँपल बोर लागवड मिळवून देईल तुम्हाला जास्त नफा. यास बाजारात मागणी देखील जास्त आहे. बोराची ही जात जास्त चविष्ट आहे. याची चव आंबत गोड असते.तसेच या बोरामध्ये अनेक पोषकतत्वे उपलब्ध आहेत. ही पोषकतत्वे शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. शेतकऱ्यांचे सफरचंद म्हणून देखील थाई अँपल बोरास ओळखले जाते. हे एक हंगामी पीक असून हे मुलाचे थायलंडचे आहे. या फळाचा आकार अँपल सारखा असून अतिशय चमकदार हे फळ आहे. या बोरीची जात बाजारात आल्यापासून याच्या लागवडीकडे शेतकऱयांचा कल वाढत आहे. महाराष्ट्रात देखील या पिकाची लागवड केली जात आहे. अश्या गुणी बोराच्या जातीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
थाई अँपल लागवड महत्वपूर्ण बाबी –
१. थाई अँपल बोराची लागवड संपूर्ण भारतात सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.
२. ज्या जमिनीवर पाणी साचून राहते अश्या जमिनीवर या पिकाची लागवड करणे टाळावेत.
३. या पिकाच्या लागवडीसाठी कोणतेही बी नसते फक्त कलमाद्वारे या पिकाची लागवड करता येते.
४. या पिकाच्या एका रोपाची किंमत ही ३० ते ४० रुपये पर्यंत असते.
५. जास्त आद्रता असणाऱ्या हवामानात या पिकाची लागवड करूनये .
६. हे झाड संकरित प्रजातीचे असते.
७. वर्षातून २ वेळेस जुलै – ऑगस्ट तसेच फेब्रुवारी – मार्च महिन्यात लागवड करता येते.
८. थाई अँपल बोराची लागवड करतांना सुरवातीस खर्च जास्त लागतो. परंतु एकदा लागवड झाल्यानंतर खर्च कमी येतो तर उत्पन्न जास्त मिळते.
९. या जातीची रोपे साधारणतः २० वर्षापर्यंत उत्पादन देते.
१०. सुरवातीस एका झाडापासून ३० ते ४० किलो उत्पादन मिळते तर कालांतराने १०० किलो पर्यंत उत्पादन मिळते.
थाई अँपल बोराची मागणी अनेक कंपन्या करतात.त्यामुळे यापिकाची लागवड करून बक्कळ पैसा कमवता येतो.