अशी वाढवा तुमची रोगप्रतिकारशक्ती !
उपवासाच्या दिवशी बऱ्याचदा खाल्ले जाणारे खजूर हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. खजुरामध्ये असणाऱ्या लोहाच्या प्रमाणामुळे अशक्तपणावर हा एक रामबाण उपाय आहे.
चला पाहुयात खजूर खाण्याचे फायदे :-
१. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास कमी होण्यास मदत होते.
२. ताज्या स्वरूपातील खजूर हे फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी मदत करते .
३. ताजे खजूर शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी मदत करते.
४. ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा नैसर्गिक स्वरूपात शरीराला पुरवठा होतो.
५. सुमारे ६० ग्रॅम ताज्या खजुरातून १४२ कॅलरीज मिळतात. यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
६. प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते.
७. ताज्या खजूरामध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी मदत होते.
८. खजूरामुळे शरीरास ऊर्जा मिळण्यास मोठी मदत होते. यामुळे आपण उत्साही आणि तजेलदार राहतो.