अश्या जमिनीत मुळा पिकाची लागवड करून कमवा भरगोस उत्पन्न
मुळा पिकाचे आयुर्वेदात महत्व आहे. थंड हवामानातील मुख्य पिकमधील मुळा एक पीक मानले जाते. मुळामध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. या पिकच्या लागवडीसाठी योग्य जमीन व हवामानाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मुळा पिकासाठी अनुकूल हवामान –
१. या पिकाची वाढ 20 ते 25 अंश से तापमानामध्ये जोमाने होते.
२. मुळाला स्वाद येण्यासाठी , त्यातील तिखटपणा कमी व्हावा यासाठी 15 ते 30 अंश से. तापमान ऊतम ठरते.
३. जास्त तापमानात हे पीक घेतल्यास मुळा लवकर जुना होतो.
मुळा पिकासाठी जमीन अशी असावी –
१. मुळा पिकासाठी जमीन भूशभुशीत असावी लागते.
२. भारी जमीन असल्यास जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी. जेणेकरून मुळे वेडेवाकडे येणार नाही.
३. मध्यम ते खोल भुसभुशीत , रेताड जमिनीत मुळा उत्तम येतो.
४. चोपण जमीन या पिकस उत्तम ठरत नाही.
उष्ण समितोष्ण हवामानात घेतल्याजणार्या जाती –
१. पुसा हिमाणी
२. पुसा देशी
३. पुसा चेतकी
४. पुसा रेशमी
५. जपानीस व्हाइट
६. गणेश सिन्थेटिक
अश्याप्रकारच्या जमिनीत व हवामानात मुळा पिकाची लागवड केल्यास उत्पादन जास्त होऊन भरघोस उत्पन्न मिळते.