आरोग्यासाठी फायदेशीर ड्रॅगन फ्रुट
ड्रॅगन फ्रूट हे फळ दिसायला थोडे वेगळे दिसते पण ते खाण्यासाठी खूप चवदार असते. आधी मेक्सिको, दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेत याची लागवड केली जायची, पण आता भारतातही त्याची लागवड केली जात आहे. हे पीक कमी खर्चात येते. कमी खर्चात सुद्धा चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे शेतकरी आता वळत आहेत. आरोग्यासाठी लाभदायक असल्याने बाजारात सुद्धा या फळाची जास्त मागणी आहे. हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे ड्रॅगन फ्रुट कोरोनासारख्या आजारांवर लाभदायक आहे. हे फळ गुलाबी-जांभळट रंगाचे असते.
ड्रॅगन फ्रुटचे फायदे :-
१. हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.
२. ड्रॅगन फ्रुट हे मधुमेह, संधिवात, कर्करोग आणि दमा इत्यादी आजार नियंत्रित करते.
३. शरीरातील हानीकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
४. अन्न पचन शक्ती वाढते.
५. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यासोबतच या फळांपासून जॅम, आईस्क्रीम आणि जेली सारखे पदार्थ सुद्धा बनविले जातात.
६. सौंदर्यप्रसाधनांमध्ये फेस पॅक म्हणून याचा वापर होतो.
७. डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारात ड्रॅगनफ्रुट खाल्ले जाते.
८. यात कॅलरी कमी असून, अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत.
असे हे ड्रॅगनफ्रूट नावाचे चविष्ट फळ आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर ठरते.