सौर कृषिपंपासाठी नवीन अर्ज घेण्यास सुरुवात …
सौर कृषिपंपासाठी नवीन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्यासाठी महावितरणच्या वेब पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून १० टक्के व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत ०३ HP व ०५ HP चे लाखों रुपयांचें सौर कृषिपंप फक्त ८,२८० रुपये ते २४,७१० रुपये पर्यंत मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
सौर कृषिपंपाबाबत काही आवश्यक बाबी
१. अर्जदाराने A -१ फॉर्म वर तसेच घोषणापत्रावर सही करणे अनिवार्य आहे.
२. A -१ फॉर्म पीएत झल्यानंतर १० दिवसांच्या आत फिल्ड ऑफिसमधून डिमांड नोट जरी करण्यात येते. यामध्ये काही विसंगती निर्माण झाली असेल तर अर्जदाराला कळवण्यात येईल.
३. प्रत्येक टप्याची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
४. नवीन अर्जदारास अर्ज सादर करतांना सर्व फिल्ड भरणे अनिवार्य आहे.
हे ही वाचा (Read This ) युवा शेतकऱ्यांना मिळणार शासनाकडून या व्यवसायासाठी 50% अनुदान.
अर्जासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे
१. ७/१२ उतारा
२. आधार कार्ड
३. कास्ट प्रमाणपत्र ( एससी /एसटी लाभार्थी )
कुठे अर्ज करावा ?
https://www.mahadiscom.in/solar/