सोयाबीन पिकाला पर्यायी पीक ? ८० दिवसात मिळणार उत्पन्न
शेतकऱ्यांनी काळासोबत बदलण्यास सुरुवात केली असून अनेक शेतकरी आधुनिक शेतीचा अवलंब करतांना दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून सोयाबीनची चर्चा सगळीकडे रंगली आहे. सोयाबीनचे उत्पादन यंदा कमी आले असून त्याच्या भावात सातत्याने चढ उतार होतांना दिसून येत आहे. आता उन्हाळी हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज असला तरी एक असे पीक आहे जे सोयाबीनच्या ऐवजी पर्यायी पीक म्हणून घेता येते. ते पीक म्हणजे राजमाचे पीक होय.
पुणे तसेच सातारा येतील काही शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून ५ हजार रुपयांचे ३२ किलो बियाणे खरेदी करून नोव्हेंबर महिन्यात दीड एकरात त्याची पेरणी केली होती. सोयाबीन पेरणी पद्धतीसारखाच राजमा बियाण्यांची पेरणी केली असून ७६ व्या दिवशीच या राजमा पिकातून चांगले उत्पन्न मिळाले आहे. साधारणतः १३ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाले आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठीच्या १४ अंकाचा युनिक लँड आयडीची चाकण पासून सुरुवात
राजमाला अनेक ठिकाणी चांगल्या दरात मागणी
सध्या राजमाला साडेसात ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून बाजारपेठेत राजमाची मागणी देखील आहे. थंड प्रदेशात राजमाची भाजी ही अत्यंत आवडीने खाल्ली जाते. मुंबई, पुणे, दिल्ली आदी शहरात तर हॉटेल मध्ये राजमाच्या वेगवेगळे पदार्थ बनवले जात असून राजमाचे पंजाबी स्टाईल राजमा, राजमा उसळ, राजमा मसाला आदी भाजीचे प्रकार तिथे सहज मिळतात.
हे ही वाचा (Read This )ड्रोनने शेत फवारणीसाठी मिळणार १० लाखापर्यंत अनुदान