कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा, दरात मोठी घसरण
युक्रेन – रशिया युद्धाचा परिणाम भारतातील शेतमालाच्या किमतींवर मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. तर कांद्याच्या आवक मध्ये वाढ झाली असून दरात तब्बल ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाकण बाजारात १५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून प्रति क्विंटल प्रमाणे १ हजार ते २ हजार असा दर मिळाला. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे.
कांद्याच्या दरात घट, निर्यातीवर निर्बंध …
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीसाठी कंटेनर उपलब्ध नाहीत तर कांद्याची निर्यात ही लवकर करावी लागते अन्यथा कांदा कंटेनर मध्येच खराब होतो. त्यामुळे सध्या केंद्र सरकारने शेतमाल निर्यातीवर निर्बंध लावले आहेत.
कांद्याचे आजचे दर

एकीकडे कांद्याच्या दरात घट तर दुसरीकडे वाढती महागाई …
सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये होत असलेल्या युद्धामुळे कांदा निर्यातीवर निर्बंध लागले आहेत. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. त्यात तेलाची देखील आयात थांबली असून त्यांच्या दरात वाढ होत आहे.
आधीच अवकाळीमुळे उत्पादनात मोठी घट झाली असून पिकांच्या लागवड आणि व्यवस्थापनासाठी अधिकचा खर्च लागला आहे. त्या खर्चाच्या तुलनेत अगदी कवडीमोलाचा दर मिळत आहे.
शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले
मागील दीड – दोन महिन्यांपासून लाल कांद्यास कमीतकमी १२०० ते १५०० तर जास्तीत जास्त ३००० ते ३२०० प्रति क्विंटल असा दर मिळत होता.
त्यानंतर हा दर स्थिर असल्यामुळे अर्थकारण थोडं बसत होतं . मात्र आता दरामध्ये ५०० ते ६०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आता सर्वच अर्थकारण बिघडले आहे.