शेतीला गरज मातीची सुपीकता वाढण्याची…! एकदा वाचाच
नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं तुम्हाला आठवत असेल आपले पुर्वज सांगत होते शेणखताने पीक चांगले येतं होते व पिकावर कीड व रोगसुद्धा कमी येत होते पण तो काळ आता बदलला आहे. आपन गुरा-ढोरांची संख्या कमी केली व तसा शेणखताचा वापरसुद्धा कमी व्हायला सुरुवात झाली आणि वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा मिळाला. आता आपन शेती मधे खर्च वाढवून सुद्धा उत्पादनात मात्र वाढ होईनाशी झाली. असे का बरे झाले असेल ! असे काय होते त्या शेणखतात की त्याची पुनरावृत्ती करावे असे वाटू लागले आहे !
योजना : शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी ५०% टक्के अनुदान
याचे उत्तर शोधायचा प्रयत्न मात्र शेतकऱ्यांनी केला नाही, हे लक्षात येते. शेणखत असो, कंपोस्ट खत असो, यामध्ये पिकाला लागणाऱ्या १६-१७ अन्नद्रव्यांसोबतच अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे अर्थातच जमिनीची उपजाऊ शक्ती वाढविणारे जिवाणू असतात. परंतु पिकाला आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांची मात्रा आपल्याकडे आता तरी उपलब्ध असलेल्या शेणखता मधून आपण पूर्ण करू शकत नाही.परंतु याला पर्याय तर शोधावाच लागेल ना. याला पर्याय म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या जिवाणू खताचा योग्य प्रकारे वापर! मग ही जिवाणू खते आहेत तरी काय?
गाई-म्हशींना मीठ खाऊ घातल्याने दूध देण्याची क्षमता वाढते ?
निर्सगाच्या शक्तीला कमी लेखू नका! निसर्गाने सर्व अडचणींवर उपाययोजना करून ठेवलेलीच आहे.काहि गोष्टी अजुन ही आपल्याला माहीत नाही.नवनविन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याच आधारे बी.टी. तंत्रज्ञानाने नैसर्गिकरीत्या अळीवर नियंत्रण मिळविले गेले. परिणामी, कीटकनाशकाचा एकरी हजारो रुपयांचा खर्च वाचवून आपले होणारे नुकसान तर टळलेच. शिवाय उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पडली. हा झाला कीटकनाशकाचा भाग! यासोबतच आपल्या शेती व्यवसायात रासायनिक खतांचा वापरगैरवापर, नुकसान-फायदे, वारेमाप वाढलेल्या किमती हा एक प्रश्न निर्माण झाला; परंतु वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अडचणीवर निसर्गाने निसर्गतःच उपाययोजना करून ठेवल्यात.
भारतातून बासमती तांदूळ निर्यातीत झपाट्याने वाढ, दोन वर्षांनंतर सर्वेक्षणाचे काम सुरू
गरज आहे त्या शोधण्याची, आत्मसात करण्याची! रासायनिक खतांचा वापर आपणास कमी करता येईल. आपल्या शेती व्यवसायात उत्पादनाच्या २५% खर्च रासायनिक खतावर होत असावा. गैरवापर, अतिरेकी वापर यामुळे आपला उत्पादन खर्च तर वाढतो आहेच. शिवाय जमिनीचा कस दिवसेंदिवस खालावत आहे. बाबी ज्यामुळे यावर उपाययोजना शोधणे आज काळाची गरज झाली आहे…..
हर्बल फार्मिंग: हे पीक 3 महिन्यांत 3 पट कमाई करून देईल, जाणून घ्या त्याचे फायदे
धन्यवाद
विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
Save the soil all together
मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
Agriculture development and technology (social media )
Brimato plant:आता एकाच रोपावर 3-3 भाज्या उगवतील, विशेष तंत्र
EPFO खातेधारकांना EDLI योजनेत 7 लाख रुपये मिळतात, जाणून घ्या संपूर्ण माहिती