पिकपाणी

आपल्या शेतजमिनीची उत्पादकता घटत आहे का ?

Shares

कुठलेही पीक लावल्यावर आपण बघत असतो की विविध प्रकारच्या किडींचा सामना पिकाला करावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारची फवारणी, बुरशीनाशके यांचा वापर करावा लागतो. नाहीतर पीक टिकत नाही. सध्याच्या काळात आपण बघत असाल की आपण कोणतेही पीक लावले आणि ते सहजच व्यवस्थित आणि पूर्णपणे वाढले असे फार कमी वेळा होते. पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत वारंवार डोस द्यावे लागतात. जवळपास सगळ्याच पिकांना काही ना काही औषधफवारणी करावी लागते. सर्वच पिकांना टिकवून ठेवणे आणि त्यावर पडणाऱ्या रोगांचा सामना करणे हे आव्हानात्मक झाले आहे.

     औषध फवारणीसारख्या गोष्टींची आपल्याला गरज पडते, कारण मुळातच जमिनीचा कस कमी झाला आहे. जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाला आहे. 

सुपीक जमिनीला असणारा तिचा काळा रंग हा त्या मातीतील “ह्युमस” सारख्या सेंद्रिय कर्बामुळे येतो. जो मातीचा कस टिकवून ठेवण्यास महत्वपूर्ण ठरतो.

     संशोधन सांगते की, मानव-वनस्पति आणि प्राण्यांचे संतुलित पोषण होण्यासाठी एकुण ७५ मुलद्रव्यांची आवश्यक असतात त्यापैकी किमान १६ मुलद्रव्यांची सामान्यपणे गरज असते. चला पाहुयात हे कोणते घटक आहेत. 


मायक्रोन्युट्रिएन्ट- ( कॅापर ,झिंक, बोरान,फेरस, मँगेनिज, मॅालीब्डेनम व क्लोरिन / निकेल / कोबाल्ट )
दुय्यम मूलद्रव्ये-( कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर )
मुख्य मुलद्रव्ये-(नायट्रोजन, फॅास्फोरस, पोटॅश ).
नैसर्गिक घटक -( कार्बन , ओक्सिजन व हायड्रोजन )

या मूलद्रव्यांमुळे वनस्पतिची सुदृढ़ वाढ होते.

      पूर्वीच्या काळी चालणारी शेती हे जुन्या पद्धतीने असायची, जमिनीचा कस टिकून राहायचा कारण, त्यावेळी जवळपास सर्वच पोषण हे सेंद्रिय घटकांतून उपलब्ध व्हायचे. ज्यामुळे ह्युमस हा घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायचा. आज तसे चित्र दिसत नाही. आजघडीला जास्त प्रमाणात औषधफवारणी केले जाते आणि बऱ्याच ठिकाणी पोषणाबद्दल जास्त विचार होताना दिसत नाही. 

      जमिनितील आढळणारा सेंद्रिय कार्बन हा मातीतील जिवाणुंच्या उर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. हेच जिवाणू पिकाच्या अपटेक सिस्टमचे प्रमुख शिलेदार आहेत.आपल्या पुर्वजांना शेतीतील हा अतिशय महत्वपूर्ण भाग माहित होता. त्यामुळे ते जमिनिचा कस ( सेंद्रिय कर्ब ) टिकवुन ठेवत आले. ज्यामुळे त्यांना हजारो वर्ष समृद्ध आणि शाश्वत शेती करता आली. सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवण्यासाठी केला जाणारा उपाय म्हणजे देशी जनावरांचे कसदार चारा खाउन तयार होणारे आणि पुर्णपणे कुजलेले कंपोष्ट खत जे वर्षभर साठवलेले असते. अश्या खतात ह्युमस चांगल्या प्रमाणात आढळते. 

      सध्याच्या काळातील संकरित जनावरांच्या शेणामध्ये ह्युमस हे खूप कमी प्रमाणात आढळून येते. यामुळे त्या शेणामध्ये चोथा जास्त असतो. हा चोथा जर खताच्या रूपात जमिनित गेला तर कुजण्याऐवजी सडतो, त्यामुळे उपयुक्त बॅक्टेरिया उत्पन्न होण्याचे प्रमाण कमी असते. आणि त्याचा परिणाम म्हणजे हानिकारक बुरशांची मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागते. 

याचा अर्थ असा कि जर आता आपल्याला देशी गाई सोबत घेऊन शेती करता आली, तर शेतजमीनीचा कस टिकून राहण्यास मदत होईल आणि जमिनीची उत्पादकता वाढेल…

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *