‘माती’ निसर्गाची शंभर वर्षाची तपश्चर्या – एकदा वाचाच
नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं आपला उद्देश शेती मधे एकच असतो तो म्हणजे लागणारा खर्च आपन शेती मधे रसायनाचा बेसुमार वापर करत आहे.या पृथ्वी तळावरील हर एक गोष्टीला निसर्गाने वेळ दिला आहे.आपन जर वेळ व काळानुसार शेतीमध्ये योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले तर शेती अबाधित राहील. जसे खतांचा आपन समतोल केल्याने उत्पादन खर्चात कमी होऊ शकतो पण आज आपली परीस्थिती अशी आहे की शेती या व्यवसायात आज पिकांचा उत्पादन खर्च ही मोठी आपली डोकेदुखी झालेली आहे.
आता मच्छीमार आणि पशुपालक शेतकऱ्यांनाही 1.60 लाख रुपयांपर्यंतचे ‘ गॅरंटी ‘ फ्री लोन
हे उत्पादन खर्च जेवढे कमी होतील तेवढी आपली शेती आपल्याला परवडणार आहे आणि या कामात आपले शेणखत व जैविक खते अनेक अर्थांनी उपयोगी पडत असते. याचा विचार करून गांडूळाची मदत घेऊन शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.शेणखताचे फायदे पहात असताना आपण ज्या मातीत शेती करतो त्या मातीचे स्वरूप समजून घेतले पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
या काळ्या माती वर आपली उपजीविका अवलंबून आहे भरण-पोषण करत असते. पोटाला धान्य देते,शेतातली काळी माती ही एक सजीव वस्तू आहे ही लोकांची अशी कल्पना आहे.दिसायला तर माती निर्जीव दिसते, मग ती सजीव कशी ? असा प्रश्न कोणाला पडेल.परंतु शेतातली माती हा एक सजीव घटकच आहे ही कल्पना आता वैज्ञानिक सुद्धा मानायला लागले आहेत.कारण या मातीमध्ये अनेक जीवाणू आणि विषाणू वास करत असतात.हे काही सांगायला नवीन नाही.त्या सर्वांच्या हालचाली या मातीमध्येच होत असतात.
कमी मेहनत जास्त उत्पन्न ,कधीही करा लागवड मिळवा भरगोस नफा
त्यांचे जीवन चक्र या मातीमध्येच आणि मातीमध्ये उगवणार्या पिकांच्या बरोबरीने चालत असते आणि संपतेसुद्धा.मातीमध्ये चालणार्या या जीवनाच्या उलाढालीमुळेच माती हा सजीव घटक मानावा लागतो.मातीला सजीवपणा देणार्या सर्व जिवाणू चे कार्य आहे,शेतातल्या मातीचा वरचा सुपीक थर हा काही आपल्या हाताने तयार होत नाही. वर्षानुवर्षाचे निसर्गाचे अनेक प्रकारचे संस्कार होऊन ही माती शेती करण्यास योग्य अशी झालेली आहे.तिची पाणी धारण करून ठेवण्याची किंवा ओल टिकवून ठेवण्याची क्षमता ही शेतीमध्ये सर्वाधिक महत्वाची आहे.शेतातल्या मातीमध्ये आपण जितके मातीचे कण अधिक मिसळू तितका मातीचा पोत वाढणार असतो आणि ती माती अधिक सुपीक होणार असते.
सोयाबीनचा भाव: मागणीत घट आणि पुरवठा वाढल्याने सोयाबीनच्या भावात मोठ्या घसरणीची शक्यता !
जमिनीचा हा पोत तयार व्हायला शेकडो वर्षे लागतात. पण शेकडो वर्षात तयार झालेला थर वाहून जायला एखादा जोरदार पाऊस पुरतो,निसर्गाची शंभर वर्षाची तपश्चर्या निष्काळजीपणा केल्यास काही मिनिटांमध्ये मातीच्या रूपाने वाहून जाऊ शकते. त्यामुळे मातीची धूप होऊ नये याबाबत उपाय सुचवलेले असतात.शेतातल्या मातीचा सुपीक थराचा पोत कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे वरच्यावर पिके घेणे होय.आपण एखादे पीक घेतो तेव्हा मातीच्या थरातला कस ओढून घेत असतो.तो कस म्हणजेच पोषक द्रव्ये शोषून घेऊनच पीक तयार होत असते.
ही बातमी वाचली तर कदाचित तुम्ही सोयाबीन बाजारात विकणार नाही….
आपण वरचेवर पिके घेतो परंतु त्या पिकांच्या रुपाने शोषून घेतलेल्या कसाची आणि पोषक द्रव्यांची भरपाई करत नाही.अशी भरपाई न करता वर्षानुवर्षे पिके घेतली की, जमिनीची ताकद कमी होते.पिकाचा उतारा कमी यायला लागतो. मग तो वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा मारा केला जातो.रासायनिक खते विरघळतात आणि संपून जातात. पीक येते, परंतु जमिनीच्या ताकदीला त्या खतांचा उपयोग होत नाही. उलट शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत अशी सेंद्रीय खते शेतात टाकली की,पिकांना पोषक द्रव्येही मिळतात आणि जमिनीच्या पोतात भरती करणारे मातीचे कणसुद्धा मिळतात.
मत्स्यपालनासाठी 60% अनुदान, कसे घ्यायचे ते जाणून घ्या
कारण ही सारी खते पोषक द्रव्ये संपली की, मातीचे रूप धारण करून मातीची घनता वाढवतात. म्हणजे सेंद्रीय खतांनी जमिनीचा पोत सुद्धा वाढत असतो. सेंद्रीय खतांचा हा वेगळा उपयोग आहे. जो रासायनिक खतांनी साध्य होत नाही. एखाद्या पैलवानाला कुस्तीसाठी तयार करायचे असते.पण तो व्यायाम करत नसेल आणि मुळात आपले शरीर बळकट करत नसेल तर त्याला एखाद्या कुस्तीपुरते शक्तीचे इंजेक्शन दिले जाते किंवा आजच्या काळात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तेजक औषधे घेऊन तात्पुरती तयारी केली जाते.
कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार,10 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी !
त्यामध्ये शरीराची तयारी काहीच होत नाही.पैलवान याचे शरीर कायमचे दुर्बळ राहते, ते इंजेक्शनापुरतेच तयार होते.रासायनिक खताची मात्रा ही अशी असते.ती पिकापुरती उपयोगी पडते परंतु सेंद्रीय खते मात्र जमिनीची ताकद वाढवतात.जमिनीची ताकद सातत्याने पिके घेतल्याने कमी होते.त्या ताकदीची भरपाई दोन प्रकारांनी केली जाते.एकतर भरपूर पोषण द्रव्ये असणारे सेंद्रीय खत वापरल्यानेआणि दुसरे म्हणजे पिकांचा योग्य फेरपालट करण्याने. सेंद्रीय खतांचा परिणाम पिकावर रासायनिक खतापेक्षा थोडा उशिराच होतो.कधी कधी तर शेणखतावर घेतलेल्या पहिल्या पिकाला तो खत लागूही होत नाही पण त्याची ताकद एवढी असते की नंतरच्या तीन पिकांना तो खत उपयोगी पडतो.तशी स्थिती रासायनिक खताची नसते.
बंची टॉप विषाणू केळीच्या झाडांचा शत्रू, असे करा संरक्षण
एकदा वापरला की संपला.काही काही वेळा पाऊस हुलकावणी देतो.आधी चांगला पडतो म्हणून शेतकरी पेरणी करतात पण नंतरची नक्षत्रे दगा देतात.पिके वाळून जातात.नंतर पुन्हा पाऊस पडतो. फेरपेरणी करावी लागते.अशी फेरपेरणी करणारा शेतकरी रासायिनक खते वापरणारा असेल तर त्याला त्या फेरपेरणीबरोबर पुन्हा नव्याने रासायनिक खत आणावा लागतो.त्यावर खर्च होतो,पण, शेतकरी सेंद्रीय खते वापरणारा असेल तर त्याला फेरपेरणी करताना फक्त बियाणांची गरज असते. त्याला दुसर्या पेरणी सोबत सेंद्रीय खत नव्याने वापरावे लागत नाही.शेतात वर्षानुवर्षे सद्रीय खते टाकलेली असतील तर जमिनीचा पोत सुधारतोआणि अशा जमिनीची ओल टिकवून ठेवण्याची शक्तीही वाढलेली असते.ज्या जमिनीत सातत्याने रासायनिक खते वापरलेली असतात त्या जमिनीतली माती निर्जिव आणि रेताड झालेली असते.वाटल्यास कोणीही ही गोष्ट पडताळून पाहू शकतात.
उत्पादनात घट आणि मागणी जास्त होण्याच्या भीतीने तांदळाच्या दरात 30% टक्क्यांनी वाढ
ज्या जमिनीत सातत्याने उसाचे पीक घेतलेले असते आणि सतत रासायनिक खताचा मारा केलेला असतो त्या जमिनीचा पोत खराब झालेला असतो. आपल्या भागात पाऊस लहरी झाला आहे.कधी तरी मधूनच हुलकावणी देतो आणि दोन दोन नक्षत्रे गायब होतो.पोत चांगला असलेल्या जमिनीत अशाही अवस्थेत ओल कायम टिकून असते. तिथली पिके लगेच वाळायला लागत नाहीत पण, रेताड झालेल्या जमिनीत मात्र आठ दहा दिवस जरी पावसाने हुलकावणी दिली तरी लगेच पिके माना टाकायला लागतात. कारण त्या जमिनीत दुष्काळाचा मुकाबला करण्याची ताकद राहिलेली नसते.आजकाल पावसाचे टाईम टेबल बिघडायला लागले आहे
आणि वारंवार दुष्काळाची हाकाटी व्हायला लागली आहे या मागे हे कारण आहे.ही हाकाटी कमी करायची असेल तर आपल्या जमिनीचा मगदूर किंवा पोत सुधारला पाहिजे आणि त्यासाठी मातीत भर टाकणारी खते वापरली पाहिजेत.बरे या खतासाठी लागणारी सामुग्री आणायला कोठे दूर जावे लागत नाही.शेतच आपल्याला ती सामग्री देत असते. त्याकडे आपले दुर्लक्ष असते. ही सामग्री नीट वापरली तर उत्तम गांडूळ खत किंवा कंपोष्ट खत तयार होतो.त्यामुळे जमिनीची मूळ ताकद वाढते.
फणस लागवड: पावसाळ्यात फणस लागवडीतून शेतकऱ्यांना वर्षाला 8 ते 10 लाखांचा नफा मिळेल, जाणून घ्या
आपण वापरत असलेला तिचा कस यातूनच तिला परत देत असतो,जमिनीचा वापरलेला पोत परत फेडण्याचा आणखी एक नैसर्गिक उपाय म्हणजे पिकांचा फेरपालट. एकदल धान्य आणि द्विदल धान्य यांचा पालट करणे. आणि तो द्विदल धान्ये जमिनीत ओढून घेत असतात.अशा नैसर्गिक गोष्टी सोडून आपण नको त्या खर्चिक पद्धतींच्या मागे लागलो आहोत. त्या पद्धतीत होणार्या तात्पुरत्या फायद्याच्या विचारात वाहवत जाऊनआपण दीर्घकालीन नुकसानीकडे दुर्लक्ष करायला लागलो आहोत…….
विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
milindgode111@gmail.com
Save the soil all together