बियाण्यास बिजप्रक्रीया करणं का महत्वाचं…!
नमस्कार शेतकरी बांधवांनो खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे.महत्वाच म्हणजे पेरणी पुर्व बिजप्रक्रीया हे बियाण्याचा महत्त्वपुर्ण भाग आहे.सोयाबिन तुर,मुग,उळीद यांना बिजप्रक्रीया करणं आपल्यासाठी शेतीसाठी उपयुक्त आहे.जसे जैविक पद्धती मधे ऍझोटोबॅक्टर आहे हे जिवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून जैविक पद्धतीने काम करतात. हे हवेतील नत्र शोषून पिकांना उपलब्ध करून देतात. हे जिवाणू शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल, तृणधान्य पिकांना उपयोगी पडतात. 250 ग्रॅम जिवाणू संवर्धकाची प्रतिदहा किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पिके : ज्वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा इ.
UIDAI: आता पोस्टमन तुमच्या घरी येऊन बनवेल आधार कार्ड, महिलांना घरपोच मिळणार ९०% सेवा
रायझोबियम
हे जिवाणूशेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर गाठी निर्माण करून हवेतील नत्रवायू शोषून घेऊन मुळांवाटे पिकास उपलब्ध करून देतात. रायझोबियम जिवाणूसंवर्धक सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत. वेगवेगळ्या गटांतील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रोयझोबियम गटाचे जिवाणूसंवर्धक वापरावे. 250 ग्रॅम जिवाणू संवर्धकाची प्रतिदहा किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
सावकारांचे कर्ज टाळायचे असेल तर तुम्ही KCC लगेच बनवा फक्त 3%टक्के व्याज, ही आहे संपूर्ण प्रक्रिया
ऍसिटोबॅक्टर
शर्करायुक्त पिकांमध्ये मुळांद्वारे हे जिवाणू प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात. हे जिवाणू आंतरप्रवाही असल्याने स्थिरीकरण केलेल्या नत्राचा पीकवाढीमध्ये सर्वाधिक वापर होऊ शकतो. पिकास 40 ते 50 टक्के नत्राचा पुरवठा करतात.
स्फुरद विरघळविणारे जिवाणू
हे जिवाणू जमिनीतील अविद्राव्य स्थिररूपी स्फुरदाचे द्राव्य रासायनिक स्वरूपात रूपांतर करून ते पिकांना उपलब्ध करून देतात. 250 ग्रॅम जिवाणू संवर्धकाची प्रतिदहा किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी कारण बिज प्रक्रिया ही काळाची गरज आहे.
धन्यवाद शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपलं हे वर्ष सुख समृद्धी चे जावो……
श्री प्रा.प्रमोद मेंढे सर
विषय विशेषज्ञ कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र,
घातखेड अमरावती १
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे इंदापूरातील ठिकाण बदलले, ‘हे’ असेल नवीन ठिकाण