शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?
कोणत्याही पिकाची शेती करण्यापूर्वी जमिनीची गुणवत्ता जाणून घेणे गरजेचे असते. त्यावर पिकाची वाढ, उत्पादन , उत्पन्न अवलंबून असते. जर जमिनीमध्ये कॅल्शिअम ची कमी असेल तर त्याचा वाईट परिणाम पिकांवर होतो. अश्यावेळेस शेतकरी मातीचे आरोग्य टिकून राहावे यासाठी जिप्सम चा वापर करतात.
साधारणतः शेतकरी शेतीसाठी नायट्रोजन, पोटॅशिअम, फॉस्फरस चा वापर करतात. मात्र शेतीसाठी कॅल्शिअम तसेच सल्फर चा वापर करत नसल्यामुळे जमिनीमध्ये सल्फर , कॅल्शिअम ची कमतरता भासत आहे. जिथे सघन शेती केली जाते अश्या जमिनीमध्ये कॅल्शिअमची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे जिप्सम चा वापर केला जातो. जिप्समचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट असून त्यामध्ये २३.३ टक्के कॅल्शियम आणि १८.५ टक्के सल्फर असते.
एका हेक्टरमध्ये ७६ क्विंटल गव्हाचे उत्पादन देणारं हे वाण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास उपयुक्त
जिप्समचे फायदे
१. जिप्सम कॅल्शिअम तसेच सल्फर ची कमतरता भरून काढून पिकांच्या मुळाचा वाढीस मदत करते.
२. जिप्सम मध्ये मुबलक प्रमाणात सल्फर उपलब्ध असल्यामुळे पिकांचे संरक्षण होते.
३. तेलबिया पीक घेतांना जिप्सम चा वापर केल्यास पीक, तेल यांच्या सुवासासाठी उपयुक्त ठरते.
४. जिप्सम चा वापर केल्यास मातीतील कॅल्शिअम बरोबर नायट्रोजन, फॉसफरस, पोटॅशिअम यांची वाढ होते.
५. जिप्सम जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.
जमिनीमध्ये कॅल्शियम कमी असण्याचे लक्षणे
१. कॅल्शिअम ची कमतरता असेल तर पानांचा काही भाग पांढरा होतो.
२. झाडांची पाने आकसून जाऊन मोडतात.
३. कॅल्शिअम जास्त प्रमाणात कमी असेल तर पिकांची वाढ खुंटते.
४. पीक सुकण्यास सुरुवात होते.
शेतीतील उत्पादन वाढवायचे आहे, मग हे नक्की कराच…
जिप्सम चा वापर कसा करावा?
१. जिप्सम ला पीक लागवड करण्यापूर्वी जमिनीला दिले जाते.
२. जिप्सम टाकण्यापूर्वी जमीन २ ते ३ वेळा चांगली नांगरून घ्यावी.
३. जिप्सम त्यानंतर मातीमध्ये मिसळावेत.
४. साधरणतः प्रति हेक्टर १० ते २० किलो कॅल्शिअम भात त १५ किलो कॅल्शिअम कडधान्य जमिनीमधून घेतात.
जिप्सम चा वापर करतांना काय काळजी घ्यावी?
१. जिप्सम ला जमिनीपासून थोडे वर ठेवावे तसेच नरम जागी ठेवण्यापासून टाळावे.
२. मृदा परीक्षण करूनच जिप्सीमचे प्रमाण ठरवावेत.
३. जोरदार हवा असेल तर जिप्समचा छिडकाव करू नका.
४. संपूर्ण शेतामध्ये जिप्सम चा समान प्रमाणात छिडकाव करावा.
५. जिप्सम चा छिडकाव केल्यानंतर माती चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावी.
६. लहान मुलांपासून जिप्समला दूर ठेवावेत.
गायक केके यांच्या मृत्यूबाबत गूढ वाढलं ; कोलकात्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद