आनंदाची बातमी : मान्सून १० दिवस अगोदर २७ मे पर्यंत केरळमध्ये धडकणार
या वर्षी मान्सूनचं आगमन वेळे आधीच होणार आहे . येत्या २७ मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली असून . पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे .
केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे ३१ मे रोजी दाखल होतो. गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता. आता या वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे .
सेंद्रिय शेती आणि तंत्र – एकदा वाचाच
भारतात पाच दिवस मान्सून आधी येणार असल्यामुळे त्याचा फायदा हा देशातील शेतकरी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. २२ मे पर्यंत अंदमान मध्ये मान्सून दाखल होत असतो मात्र १३ मे ते १९ मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदाच्या खरीपात मक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर सौदा, हे आहे मोठे कारण
या वर्षी देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.