पिकपाणी

पिकाचा काळ ६० दिवस उत्पन्न लाखोंचे … !

Shares

कडधान्य प्रकारात मोडणारे उडीद हे पीक साधारणतः ७० दिवसांच्या काळामध्ये येणारे पीक आहे. पूर्णपणे उडीद लावण्यासोबतच उडीदाची आंतरपीक म्हणून सुद्धा लागवड करतात. याला मध्यम, भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते. हलक्या जमीनीत लागवड करू नये. खरीपाच्या हंगामात कडधान्य पीकांमध्ये तुर, मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके महाराष्ट्रात घेतली जातात.

      याच्या लागवडीसाठी मार्च-एप्रिलमध्ये जमिनीची नांगरणी करून जमीन चांगली तापू द्यावी, यामुळे आधीचे किड आणि रोग नष्ट होतात. नंतर जमीन सपाट करून घ्यावी. धसकटे वेचून जमिनीची स्वच्छता करून घ्यावी. अडीच एकरात जर सुमारे ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकले, तर उत्पादनात वाढ होते. उडीदाची पेरणीसाठी जूनचा शेवटचा किंवा जुलैचा पहिला आठवाड्याची जर निवड केली, तर सर्वाधिक उत्पादन मिळते.

      पेरणी करायला उशीर झाल्यावर उत्पादन कमी होते. ४५ X १० सेमी या अंतरावर पेरणी करावी. अडीच एकरी सुमारे १०-१५ किलो बियाणे वापरावे. पेरणी करण्याच्या आधी एक किलो बियाण्याला बाविस्टीन १ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम चोळावे. ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया केली, तर बुरशीसारख्या  रोगापासून पीकाचे रक्षण होते. जिवाणु संवर्धक रायझोबियम आणि पीएसबी प्रति २५० ग्रॅम, १० किलो बियाण्याला लावून पेरणी करावी.

उडीद पिकाच्या सुधारित जाती :-

      जमिनीची मशागत करताना जमिनीत शेणखत व्यवस्थित पसरवून घ्यावे. पेरणी करताना २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रतिहेक्टरी द्यावे. पेरणीनंतर एक महिन्यात तण काढण्यासाठी एक खुरपणी आणि दोन कोळपण्या करून घ्याव्यात.

     फुल येण्याआधी किंवा पीक फुलोऱ्यात असताना याला भूरी रोगाचा फटका बसू शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी सल्फेक्स ०.३० टक्के किंवा पाण्यात विरघळणारे गंधक २०-२२ ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबतच गंधकाची २० किलो भुकटी प्रति हेक्टरी धुरळणी केल्यानेपण नियंत्रण करता येते. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी १० लिटर पाण्यात क्वीनॉलफॉस ३५ ईसी ०.०७ टक्के २० मिली याप्रमाणे मिसळून फवारणी करावी.

     उडीदाच्या शेंगा पक्क्या झाल्यावर पावसाचा अंदाज लक्षात घेऊन काढणी करून घ्यावी. तोडणी केलेल्या शेंगांना ऊन द्यावे किंवा किंवा ट्रॅक्टरने मळणी करावी. मोकळ्या हवेच्या वातावरणात शेंगांची साठवणूक करावी. जवळपास ७०-७५ दिवसांमध्ये येणारे आणि आंतरमशागत करता येणारे हे पीक योग्य काळजी घेतल्यास अगदीच कमी काळामध्ये जास्त फायदा देऊन जाते.   व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा 

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *