पाच दिवसाच्या सुट्ट्यानंतर सोयाबीनच्या दरात किंचित घट, आवक मात्र मोठ्या प्रमाणात
महिना अखेर आणि सण यात पाच दिवस सुट्ट्या असल्याने राज्यातील बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प होते. यामुळे शेतीमालाचे दर विशेषत: सोयाबीनचे काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. महिना झाली. तरी देखील सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेली पाच दिवस सोयाबीनचे दर ७ हजार ३५० असे होते. हाच दर कायम असणार या आशेने शेतकऱ्यांची निराशा झाली होती. तर दुसरीकडे खरिपातीलच तुरीची आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक वाढली आहे.
सोयाबीनसह हरभऱ्याची विक्रमी आवक पाच दिवसानंतर सोयाबीनसह हरभऱ्याची देखील आवक मोठ्या प्रमाणात आहे. हमीभावापेक्षा कमी दर असतानाही बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेत ४ हजार ५०० दर आहे. खरेदी केंद्रावर ५ हजार २३० रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. खरेदी केंद्रावरील नियम अटींमुळे शेतकरी व्यापाऱ्यांकडेच विक्रीला प्राधान्य देत आहे. त्यामुळे सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल ५० हजार पोत्यांची आवक झाली होती. तर सोयाबीनची आवक ही ३० हजार पोत्यांची झाली होती. शेतकऱ्यांना अजूनही सोयाबीन दर वाढीची अपेक्षा ही लागून राहिलेली आहेच.
*पाच दिवस बाजारपेठ बंद*मागील पाच दिवस बाजार समितीमधील व्यवहार हे बंद होते. या व्यवहार बंदचा परिणाम काल दिसून आला आहे. दुप्पट शेतीमालाची आवक झाली होती. मालाच्या भावांमध्ये थोडाफार परिणाम झाला आहे, तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन, हरभरा विक्रीवर भर दिला.
ReplyForward |