शेतकऱ्याचा नादचं खुळा, चक्क.. वासराचं बारसं केलं धुमधडाक्यात- व्हिडीओ एकदा पहाच

Shares

शेतकऱ्यांचे आणि पशूंचे नाते किती खास असते हे काही वेगळं सांगायला नको. शेतकरी अगदी आपल्या लेकरांप्रमाणे गाई, म्हशी , वासरू यांना जपत असतो. अशीच एक एका शेतकरी आणि गाईची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.

नांदेड जिल्ह्यात एक गाय अशक्तपणामुळे अगदी कोलमडून गेली होती. अगदीच मरणाला टेकलेल्या या गाईकडे एका शेतकऱ्याची नजर जाताच त्याने त्या गाईला आपल्या खांद्यावर उचलून थेट घर गाठलं. तिचे औषध पाणी केले. तिला काय हवं नको सर्व काळजी घेतली. तर तिला एक नवीन आयुष्य दिलं.

त्यानंतर त्या गाईने एका नवीन वासरास जन्म दिला. त्यामुळे कुटुंबातील सर्वांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला. हा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी या वासराचे बारसं अगदी धुमधड्याक्यात केलं.

नांदेड जिल्ह्यातील मारुती माजरवाडे नावाच्या शेतकऱ्याने २ वर्षांपूर्वी एका गाईस नवीन जीवदान दिले होते. तर आता तिने वासरू जन्माला घातलं असून या शेतकऱ्याला मुलगी नसल्यामुळे त्याने वासराला आपली मुलगी मानले आहे.

एवढेच काय तर शेतकऱ्याने त्या वासराचे बारसे केले आहे. या बारसाच्यावेळी त्यांनी जवळपास चारशे पाचशे जणांना वरणभात, पोळीभाजी, गोडबुंदी, खारी बुंदी असं गावजेवण दिले आहे.

गावातील महिलांनीं अगदी उत्साहाने पाळणे हलवत गाणे म्हंटले आणि वासराचे नाव ठेवले. या बारश्याची चर्चा आता सगळीकडे होतांना दिसत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *