असे करा शेळी पालन होईल नुसता नफाच नफा…
शेतीला पूरक जोडधंदा :- शेळीपालन
शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या आपल्या देशात बहुतांश ठिकाणी शेतीसोबतच विविध प्रकारचा जोडधंदा शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते.
त्यातीलच एक शेतीसोबत पूरक ठरणारा जोडधंदा म्हणजे शेळीपालन, ज्यालाचं गोट फार्मिंग असेही म्हंटले जाते. शेळ्यांना लागणारे खाद्य म्हणजे चारा शेतीमध्ये सहज उपलब्ध होते, म्हणून देखील हा व्यवसाय जास्त प्रमाणात निवडला जातो.
हा व्यवसाय कमी जागा आणि अल्प भांडवलात होणारा आहे. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे शेळ्यांना गायी-म्हशी आणि अन्य जनावरांच्या तुलनेत अतिशय कमी खाद्यान्न लागते म्हणून हा व्यवसाय कोणालाही सहज करता येईल असा आहे.
शेलीपालनासाठी महत्वाचा भाग म्हणजे शेळ्यांचे सर्व व्यवस्थापन योग्य रीतीने व्हायला हवे. कुठल्याही शेळीला आहारात तिच्या वजनाच्या किमान ०.५% खुराक, २% वाळलेला आणि १.५% हिरवा चार असे संतुलित प्रमाण असावे.
लागणाऱ्या चारयामध्ये सुमारे ३०-४०% बचत करायची झाल्यास शेळ्यांना खाद्य देताना लहान लहान तुकडे करून खायला द्यावे.
शेळ्यांना पिल्ले झाल्यास, त्या पिल्लांचा वाढीचा वेग जास्त असल्याने सुरुवातीचे किमान ४५ दिवस म्हणजेच सुमारे दिड महिना आईचे दुध मिळायला हवे, त्यानंतर मग पिल्लांना आहार देऊन बाहेरील खाद्य चालू करावे.
असा असावा शेळीपालनासाठी गोठा !
- गोठ्यामध्ये चारा, पाणी हा चांगला रित्या असावा. हवेशीर वातावरण असावे.
- गाभण शेळ्या, छोटी पिल्ले, आजार असणारी जनावरे आणि बोकड यांसाठी गोठ्यामध्ये काही अंतर राखून विशेष जागा करावी.
- जास्त प्रमाणात शेळ्या असल्यास त्यांच्या खाद्याचे भांडार वेगवेगळे करावे म्हणजे त्यांना खुराक पुरेसा मिळत राहील.
- आहारासोबतच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यांना वेळोवेळी लसीकरण करावे. ज्यात पी पी आर ई टीव्ही यांसारख्या लसी द्यायला हव्या.
- शेळ्यांच्या प्राथमिक पातळीवरील उपचारांसाठी व औषधांसाठी गोठ्यामध्ये वेगळी सोय असावी.
कमी गुंतवणुकीमध्ये चांगला फायदा देऊन जाणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांना लाभदायक आहे.
शेळ्या ह्या दोन पिल्लांना जन्म देऊ शकत असल्याने तो फायदा तर होतोच, शिवाय शेळ्यांच्या काही प्रजातीचा प्रजनन कालावधी हा लवकर असल्याने त्यात देखील चांगले उत्पन्न होतो.
शेळ्यांच्या लेंड्यापासून उत्तम खात होते, दुध मिळते, शेळ्यांचे शिंगापासून व खोडापासून अनेक प्रकारचे विविध प्रकारे पदार्थ बनविले जातात.
असे अनेक फायदे असणारा शेळीपालन हा जोडधंदा कोणत्याही शेतकऱ्याला सहजच करता येऊ शकतो.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क